भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सुरू असलेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी चांगलीच रंगात आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला असून मालिकेतील पुढच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणे पाहुण्या संघासाठी महत्वाचे असेल. मत्र, त्याआधीच पॅट कमिन्सने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आणि संघाच्या अडचणी वाढवल्या. आपण या लेखात ऑस्ट्रेलियन कर्णधारांची भारतातील कसोटी कामगिरी पाहणार आहोत.
भारत दौरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही संघासाठी सोपा नसतो. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ देखील याला अपवाद ठरला नाहीये. ऑस्ट्रेलिया संघाला भारतात कसोटी सामना जिंकणे नेहमीच कठीण राहिले आहे. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वातील संघालाही यावर्षी सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव मिळाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी इतिहासाचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाच्या 7 कर्णधारांना भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाहीये. यापैकी तीन कर्णधारांनी ऑस्ट्रेलिया विश्वचषक देखील जिंकवून दिला आहे.
पहिल्या दोन कसोटीत लागोपाठ पराभव स्वीकारल्यानंतर पॅट कमिन्स मायदेशात परतला. त्याने कौटुंबीक कारणास्तव तिसऱ्या कसोटीतून स्वतःचे नावही मागे घेतले. आता 1 मार्च रोजी सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मित ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. उभय संघांतील तिसरा कसोटी सामन्यापूर्वी एक महत्वापूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच कर्णधारा भारतात कसोटी सामना खेळमे सोपे राहिले नाहीये. ऑस्ट्रेलियाच्या 15 कर्णधारांपैकी 7 कर्णधार भारतात एकही कसोटी सामना जिंकू शकले नाहीत.
रिकी पाँटिंग () याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दोन वनडे विश्वचषक जिंकले, तर एलेन बॉर्डर () यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया एक विश्वचषक जिंकला. पण हे दोन्ही कर्णधारांना भारताविरुद्ध कसोटीत अपयशी ठरले. पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने भारतात 7 कसोटी सामने खेळले. यापैकी पाच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला, तर 2 सामने अनिर्णित झाले. एलेन बॉर्डरविषयी बोलायचे झाले, तर त्यांनी भारतात तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यापैकी दोन सामने अनिर्णित तर एक सामना टाय झाला. त्याव्यतिरिक्त पॅट कमिन्स, शेन वॉटसन, मायकल क्लार्क, किम ह्यूज आणि रे लिंडवाल यांनाही भारतात एकही कसोटी जिंकता आली नाही. क्लर्कच्या नेतृत्वात देखील ऑस्ट्रेलियान वनडे विश्वचषक जिंकला होता.
कर्णदाराच्या रूपात ऑस्ट्रेलियासाठी भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकले बिल लॉरी याने. लॉरी यांनी 5 पैकी 3 कसोटी सामने जिंकले आहेत. त्यापैकी एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव तर एक सामना अनिर्णित झाला. एडम गिलक्रिस्ट, रिची बिनाउड आणि इयान जॉनसन यांनी भारतात प्रत्येकी दोन-दोन कसोटी सामने जिंकले. स्टीव वॉ आणि स्टीव स्मिथ यांनादेखील प्रत्येकी एक-एक कसोटी विजय मिळाला. दरम्यान उभय संघांतील या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा विचार केला, तर तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाला मोठा लाभ होणार आहे. अजून एक विजय भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवू शकतो.
(These seven captains of Australia did not win a single test in India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“फलंदाज नव्हे गोलंदाजांमूळे हरतोय’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने लावला वेगळाच तर्क
आली लग्नघटिका समीप! सोमवारी शार्दुल चढणार बोहल्यावर, ही आहे ‘लॉर्ड’ची जीवनसाथी