Loading...

पुणे कसोटीत खेळणार हे दोन मराठमोळे खेळाडू

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून(10 ऑक्टोबर) सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे खेळवला जाणार आहे.

हा या स्टेडीयमवरील दुसराच कसोटी सामना असणार आहे. या स्टेडीयमवर याआधी फेब्रुवारी 2017 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

त्यानंतर आता उद्यापासून या स्टेडीयमवर सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात महाराष्ट्राचे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

गहुंजेच्या स्टेडीयमवरील रोहितचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. तो याआधी या स्टेडीयमवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. तर रहाणेचा या स्टेडीयमवरील दुसरा कसोटी सामना असणार आहे. रहाणेने याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे. पण त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने त्या सामन्यात 31 धावाच केल्या होत्या.

पण असे असले तरी हे दोघेही सध्या चांगल्या लयीत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापटट्णमला 2-6 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात रोहितने दोन्ही डावात अनुक्रमे 176 आणि 127 धावांची शतकी खेळी केली होती.

तसेच रहाणे या सामन्यात पहिल्या डावात 15 धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने आक्रमक फलंदाजी करताना 4 चौकार आणि 1 षटकारासह 17 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे आता उद्यापासून पुण्यात सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात या दोघांचीही कामगिरी कशी होणार हे पहावे लागणार आहे.

Loading...
You might also like
Loading...