क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड संघात एका जबरदस्त वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन झाले आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून काईल जेमिसन आहे. जेमिसन मागील एक वर्षांपासून दुखापतींचा सामना करत आहे. तो पाठीच्या समस्येने ग्रस्त होता. मात्र, आता तो पूर्णपणे फिट आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी तयार झाला आहे. न्यूझीलंड संघाने यूएई दौऱ्यासाठी जेमिसनला टी20 संघात जागा दिली आहे. तसेच, अष्टपैलू डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि फिरकीपटू आदि अशोक याला पहिल्यांदाच टी20 संघात स्थान मिळाले आहे.
प्रशिक्षकही खुश
इंग्लंड संघाविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेपूर्वी पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे समजल्यानंतर काईल जेमिसन (Kyle Jamieson) याची सर्जरी झाली होती. अशात तो पुनरागमनासाठी सज्ज आहे. खरं तर, त्याने न्यूझीलंडकडून अखेरचा सामना जून 2022मध्ये खेळला होता. न्यूझीलंड संघाला यूएईविरुद्ध 17, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी दुबई येथे 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले की, “काईल जेमिसन याने वास्तवात खूप मेहनत घेतली आहे आणि या दौऱ्यासाठी उपलब्ध राहण्यासाठी खूप प्रगती केली आहे. त्याला पुनरागमन करताना पाहून आनंद होतोय. आम्हा सर्वांना त्याच्या शानदार गोलंदाजीबद्दल माहिती आहे. मला माहितीये की, तो संघात पुनरागमन करण्यासाठी उत्साहित आहे.”
Fresh faces and a return from injury! All you need to know about the upcoming T20 series against @EmiratesCricket and @englandcricket. Read more | https://t.co/EFW0GdnxIg #UAEvNZ #ENGvNZ pic.twitter.com/jg1FLhVSmJ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 19, 2023
‘या’ खेळाडूंना संघात पहिल्यांदाच मिळाली जागा
अष्टपैलू डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि फिरकीपटू आदि अशोक यांना पहिल्यांदाच टी20 संघात जागा मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला फॉक्सक्रॉफ्ट 2016मध्ये न्यूझीलंडमध्ये आला होता. त्यानंतर त्याने न्यूझीलंडसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. त्याने सुपर स्मॅशमध्ये 424 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त सातपेक्षा कमी प्रभावी इकॉनॉमीसह गोलंदाजी करून 9 विकेट्सही चटकावल्या होत्या.
प्रशिक्षक स्टीड अशोकबद्दल बोलताना म्हणाले की, “यूएई संघात ईश सोधी सामील नाहीये. त्यामुळे आम्हाला पुढचा फिरकीपटू शोधण्याची चांगली संधी आहे. त्याने न्यूझीलंड अ संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. तसेच, त्याच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रतिभाही आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे केन विलियम्सन आणि मायकल ब्रेसवेल यांना संघात जागा मिळाली नाहीये.”
यूएई दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा टी20 संघ
टीम साऊदी (कर्णधार), आदि अशोक, चाड बोवेस, मार्क चॅपमन, डेन क्लीवर, लॉकी फर्ग्युसन, डीन फॉक्सक्रॉफ्ट, काईल जेमिसन, कोल मॅककोन्ची, जिमी नीशम, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, टिम सीफर्ट, हेनरी शिप्ली, विल यंग (this cricketer set for return in uae after recovering stress fracture new zealand t20 team 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
‘माही’चा हुकमी एक्का आख्ख्या पाकिस्तानवर पडला भारी, कट्टर प्रतिस्पर्ध्याला 205 धावांवर केले गार
‘माझा तर जन्मही झाला नव्हता…’, विंडीजविरुद्धच्या 100व्या कसोटीपूर्वी असे का म्हणाला कॅप्टन रोहित?