fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आता धोनीला भारतीय संघात पाठींबा देण्यासाठी ‘हा’ मोठा व्यक्ती मैदानात

This Former BCCI Veteran said there is a Lot of Cricket left in Dhoni

मुंबई । महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.  तो अजूनही फिट आहे. त्यांच्यामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटची सेवा अजूनही करू शकतो.

भारताचा यशस्वी यष्टीरक्षक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. कोणत्या वेळी काय करायचे हा निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे चाणाक्ष बुद्धी आहे. निवड करण्याचा मला अधिकार असला असता तर धोनी माझ्या संघात असला असता अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघटनेचे माजी कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी दिली.

गतवर्षी झालेल्या विश्वचषकानंतर महेंद्रसिंग धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. याचवेळी कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी धोनीच्या निवडीचे समर्थन केले आहे. लॉक डाउन काळात धोनीच्या निवृत्तीची अफवा पसरल्याने साक्षी चांगलीच भडकली.  त्यानंतर लॉकडाऊनमध्ये लोकांचे डोके खराब झाल्याचे ट्विट तिने केले होते. नंतर तिने हे ट्विट डिलीट करून टाकले होते.

आयपीएल बाबतीत बोलताना चौधरी म्हणाले की, खेळाडूंचा विचार लक्षात घेऊन ही आयपीएल स्पर्धा भरवली पाहिजे.  यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जर संधी मिळत असेल तर यंदाची आयपीएल हंगाम व्हायला काहीच हरकत नाही. यावर अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल घेईल. आयपीएलचा यंदाचे हे १३वे हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. मात्र, कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे विश्वचषक होण्याची शक्यता फारच कमी आहे. याच कालावधीमध्ये बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहे.

You might also like