---Advertisement---

‘या’ एका विकेटने पलटला आख्खा सामना, माजी दिग्गजाने सांगूनच टाकले भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

Team-India
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 विकेट्स गमावून केवळ 145 धावा केल्या. यजमान विंडीजने हा सामना 4 धावांनी जिंकला. यासह मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली आहे. 

आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची विकेट सामन्याचा महत्वाचा भाग ठरला. या कारणाने जेसन होल्डर (Jason Holder) याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करून योग्य निर्णय घेतला.

काय म्हणाला आकाश चोपडा?
आकाश चोप्रा त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “जेसन होल्डर सामनावीर ठरला. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. माझ्या मते हा योग्य निर्णय होता. जेसन होल्डरने योग्य वेळी हार्दिक पंड्याला बाद केले. हाच तो क्षण ज्या कारणाने संपूर्ण खेळ पलटला. हार्दिक ज्याप्रमाणे फलंदाजी करत होता त्या दृष्टीने हा सामना भारताने सहज आपल्या नावावर केला असता. 16व्या षटकापर्यंत भारताला 7.5च्या सरासरीने धावा पाहिजे होत्या. हार्दिक आणि संजू सॅमसन धावपट्टीवर सज्ज झाले होते.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “जेव्हा होल्डर 16वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा वाटले की, हे षटक खूप मोठे होईल. हार्दिक आणि सॅमसन या षटकात चांगले फटके मारून धावसंख्येत भर घालतील. हा संपूर्ण खेळ भारत संघ याच षटकात आपल्या बाजूला घेऊन जाईल. पण होल्डरने प्रभावशाली गोलंदाजी केली आणि सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने घेऊन गेला.”

होल्डरची कामगिरी
या सामन्यात होल्डरने 4 षटके गोलंदाजी करताना 19 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने हार्दिकव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव याला तंबूचा रस्ता दाखवला होता. (this former cricketer says jason holder is match winner)

महत्वाच्या बातम्या:  
Lala Amarnath: 89 वर्षांपूर्वी लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण, वाचून अभिमानच वाटेल
पहिल्या टी20तील घोडचूकीसाठी आयसीसीने भारत अन् वेस्ट इंडिजवर ठोठावला दंड, यजमानांचे मोठे नुकसान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---