ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न आपले वडिलोपार्जित घर विकत आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. वॉर्नने ट्विटरवर असेही लिहिले आहे की, तो घर विकल्याबद्दल दु:खी आहे.
शेन वॉर्नला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये गणले जाते. आपल्या बोटांच्या टोकावर त्याने दिग्गज फलंदाजांना नाचवले आहे. त्याच्याकडे नाव, कीर्तिमान आणि संपत्तीदेखील आहे. तरीही तो त्याचे आलिशान वडिलोपार्जित घर विकत आहेत.
शेन वॉर्नने म्हटले की, “होय, आम्ही ब्रिगटन, व्हिक्टोरियामधील आमचे वडिलोपार्जित घर विकत आहोत. यबद्दल खूप वाईट वाटते. परंतु मला माहित आहे की या भव्य घरात राहणारे कुटुंब आनंदी असेल. ते या घरात त्यांच्या सुंदर आठवणी बनवतील.” परंतु घर का विकत आहे हे वॉर्नने मात्र उघड केले नाही.
Yes we are selling our family home on Dec the 5th in Brighton Victoria through JPDixon real estate ! Sad but I know this amazing house will make a family very happy & they will create their own amazing memories ! ❤️ pic.twitter.com/ZRqJmfrNAg
— Shane Warne (@ShaneWarne) November 20, 2020
ऑस्ट्रेलिया माध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या की, वॉर्नसाठी घर विकणे हा पैसे कमावण्याचा एक मार्ग आहे. सन २००० मध्ये त्याने आपले माजी पत्नी सिमोन कालहनसोबत ३६ लाख डॉलर्समध्ये एक घर विकत घेतले होते. त्यानंतर त्याने जवळपास तितक्याच डॉलर्समध्ये घराची दुरुस्ती केली. त्यानंतर त्याने सन २००७ मध्ये तेच घर ८८ लाख डॉलर्समध्ये विकले होते.
शेन वॉर्नने कसोटीत 708 विकेट्स घेतल्या आहेत. सन 1990 च्या दशकात लेग-स्पिन गोलंदाजीच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत असताना वॉर्नच्या करिष्मा करणाऱ्या स्पिनने सर्वांचे विचार बदलले. ‘सेंचुरी ऑफ द बॉल’ फेकण्याचे श्रेय त्याच्याकडे आहे. या जादुई चेंडूवर त्याने माईक गॅटिंगला बोल्ड केले.
ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी आणि 194 वनडे सामने खेळलेल्या शेन वॉर्नकडे एकूण 1001 आंतरराष्ट्रीय बळी आहेत. तसेच मुथय्या मुरलीधरन (800) नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो खेळाडू आहे.
याव्यतिरिक्त त्याने कसोटी सामन्यांमध्ये 3154 आणि वनडेमध्ये 1018 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सर्वाधिक धावसंख्या 99 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..