ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली या दोघांनी या सामन्यात फलंदाजी करताना एकही अर्धशतक केले नाही. पण तरी देखील विराट आणि रोहितची चर्चा होत आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात रोहित आणि विराटच्या नावावर दिल्ली कसोटीत एका नकोशा विक्रमाची नोंद केली.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची कसोटी कारकिर्दी मोठी आहे. असे असले तरी, रोहित त्याच्या कसोटी कारकिर्दीती आतापर्यंत कधीच धावबाद झाला नव्हता. रविवारी (19 फेब्रुवारी) रोहित पहिल्यांदाच धावबाद झाला. दुसरीकडे विराट कोहलीच्या नावावर देखील रविवारी नकोशी कामगिरी नोंदवली गेली. विराट कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच यष्टीचीत झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा दिल्ली कसोटी सामना शुक्रवारी (17 नोव्हेंबर) शुरू झाल. अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हा 47 वा कसोटी सामना होत आणि एवढ्या मोठ्या कारकिर्दीत रोहित पहिल्यांदाच धावबाद झाला. दुसरीकडे विराटची कारकीर्द पाहिली, तर ती रोहितपेक्षाही मोठी. विराटने आतापर्यंत 106 कसोटी सामने खेळले आहेत आणि यात पहिल्यांदाच यष्टीचीत होऊन विकेट गमावली. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात म्हणजेच रविवारी रोहित आणि विराट पहिल्यांदा अनुक्रमे धावबाद आणि यष्टीचीत झाला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या. दुसऱ्या डावात मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाज रविंद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले. जडेजाने शनिवारी सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि रविवारी मार्नस लाबुशेन, आणि एलेक्स कॅरी यांच्यासह सहा विकेट्स नावावर केल्या. दुसऱ्या डावात जडेजाने एकूण सात तर पहिल्या डावाप्रमाणे रविचंद्रन अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. (This happened to Virat for the first time in his Test career, everyone was shocked as Rohit was run out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाच्या नावे आणखी एक विक्रम! आता विराटला पछाडत बसला थेट सचिनच्या मांडीला मांडी लावून
BREAKING: ॲास्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मोठ्या खेळाडूचं कमबॅक