कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते. त्यामुळे आता भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयपीएलमधून होणाऱ्या पुनरागमनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
परंतु धोनीच्या (MS Dhoni) लहानपणीचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी (Keshav Ranjan Banerjee) यांना आशा आहे की, भारताच्या टी२० विश्वचषक संघात धोनी स्थान मिळवेल.
भारतात सध्या लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयपीएल रद्द करण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी जुलैमध्ये वनडे विश्वचषक पार पडला होता. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर धोनी एकदाही क्रिकेट खेळताना दिसलेला नाही.
बॅनर्जी यावेळी म्हणाले की, “सध्याच्या काळात आयपीएल २०२० (IPL 2020) होण्याची शक्यता खूप कमी आहे. तरीही आपल्याला बीसीसीआयच्या (BCCI) निर्णयाची वाट पहावी लागेल. धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होणे कठीण आहे. परंतु मला अशी आशा आहे की, धोनीला टी२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल.”
“हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल. चेन्नईवरून परतल्यानंतर मी त्याच्याशी चर्चा केली आहे. तसेच मी त्याच्या आई-वडिलांच्या सतत संपर्कात आहे. धोनी फीटनेस ट्रेनिंग करत आहे आणि पूर्णपणे फीट झाला आहे. जूनपर्यंत आयसीसीची कोणतीही स्पर्धा नाही. त्यामुळे आपल्याला वाट पहावी लागेल,” असेही बॅनर्जी यावेेळी म्हणाले.
यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले होते की, आयपीएलपासून धोनीच्या भविष्यावर निर्णय घेतला जाईल. परंतु आयपीएल स्थगित झाल्यानंतर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
“हे खरे आहे की, धोनीने जुलै २०१९पासून आतापर्यंत एकही स्पर्धेत भाग घेतला नाही. परंतु त्याच्याकडे ५३८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. त्याला पुन्हा लय बसवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. रांचीमध्ये सर्वकाही बंद असून तो आपल्या घरी फीटनेस ट्रेनिंग घेत आहे. त्याच्याकडे जिम, बॅडमिंटन, कोर्ट आणि रनिंग कॉरिडॉरही आहे,” असे धोनीबद्दल बोलताना बॅनर्जी म्हणाले.
त्याचबरोबर धोनी या वर्षी जुलै महिन्यात ३९ वर्षांचा होईल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत सर्वाधिक वेळा धावबाद होणारे ५ खेळाडू, एक नाव आहे भारतीय
-सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू
-५ असे खेळाडू ज्यांच्या नावावर आहेत ५ विचित्र विक्रम