---Advertisement---

‘हा विजय विश्वचषक जिंकण्यापेक्षा…’, नेदरलँड्सच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य

Netherlands
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स संघाच्या विजयावर पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कोणती चूक केली हे त्याने सांगितले. कामरान अकमलच्या मते, आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करायला हवी होती आणि येथे त्यांनी मोठी चूक केली. नेदरलँड्सचा हा विजय विश्वचषकापेक्षा कमी नाही, असेही अकमलने म्हटले.

कामरान अकमल (Kamran Akmal) याच्या मते, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी सर्वात मोठी चूक केली. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलशी बोलताना अकमल म्हणाला, “मला वाटते की, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली, तेव्हा सर्वात मोठा फरक पडला. प्रथम फलंदाजी करून धावा केल्या, तर इतर संघ दडपणाखाली येतात. पाकिस्तानने नेदरलँड्ससोबतही असेच केले होते. दक्षिण आफ्रिकेने टी20 विश्वचषकादरम्यानही हीच चूक केली होती. हा विजय नेदरलँड्ससाठी विश्वचषक जिंकल्यासारखाच आहे.”

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषक 2023 मधील 15वा सामना धरमशाला येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना 43-43 षटकांचा खेळवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 8 विकेट्स गमावून 245 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने मधल्या फळीत फलंदाजी करताना महत्वपूर्ण खेळी करत 69 चेंडूत नाबाद 78 धावांचा पाऊस पाडला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने सुरुवातीच्या षटकांतच महत्वाच्या विकेट्स गमावल्या. त्यांचा संपूर्ण डाव 42.5 षटकात 207 धावांवर सर्वबाद झाला. आफ्रिका संघाकडून कोणत्याही खेळाडूला अर्धशतकीय खेळी करता आली नाही. त्यांना एक आश्चर्यचकित करणारा पराभव स्वीकारावा लागला आहे. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीक याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (This is more than winning the World Cup Kamran Akmal’s big statement on Netherlands’ stunning victory)

हेही वाचा-
लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या मदतीसाठी स्टोक्स उतरणार मैदानात! प्रशिक्षकांनी दिली माहिती; म्हणाले…
विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---