तब्बल आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासह मोठया मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर तीन वनडे, तीन टी -20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलसाठी ही स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल असे हरभजन सिंगने म्हटले आहे.
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग म्हणला की विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलसाठी भारतीय संघाचे दरवाजे नव्याने उघडतील. अशा परिस्थितीत केएल राहुल जवळपास एक वर्षानंतर कसोटी संघात परतू शकतो. विराट कोहली आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी भारतात परतणार असल्याने तो कसोटी मालिकेतील शेवटचे तीन सामने खेळणार नाही.
केएल राहुलसाठी उघडणार दारं
हरभजन म्हणाला की, “विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर माघारी परत येईल, पण अशा परिस्थितीत केएल राहुलसारख्या एखाद्यासाठी संधीची नवीन दारे उघडतील. विराट कोहली हा एक मोठा खेळाडू आहे आणि जेव्हा तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर जातो तेव्हा तो बऱ्याचदा धावा करण्यात यशस्वी होतो. त्याच्या अनुपस्थितीत काही खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळेल.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला, रोहित शर्मा कसोटी मालिकेत सलामीला खेळला तर ही एक मोठी गोष्ट असेल. रोहितने 2019-20 मध्ये भारताकडून कसोटी मालिकेत सलामीला फलंदाजी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला रोहितला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते, आता तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे.
तसेच हरभजन म्हणाला, “विराट कोहलीची अनुपस्थिती अशाप्रकारे पाहिली पाहिजे की केएल राहुल, चेतेश्वर पुजारा हे मोठे खेळाडू आहेत आणि त्यांना स्वत: ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.”
केएल राहुलच्या कसोटी संघातील निवडीवर अनेकांनी टीका केली आहे. कारण अनेकांचे मत आहे की त्याने त्याच्या आयपीएल फॉर्मच्या आधारे कसोटी संघात पुनरागमन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी