इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा खूप गरीब खालच्या स्तरावरील खेळाडूंना रातोरात करोडपती बनवते. मागच्या दिवसात आयपीएल 2025 मध्ये प्रियांश आर्य नाव खूप चर्चेत आहे. ज्याने गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात पंजाब किंग्ससाठी 47 धावांची तुफानी पारी खेळली होती. फ्रेंचाईजीने आयपीएलच्या मेगा लिलावात प्रियांशला 3.8 करोड रुपयांना खरेदी केले होते. हे पैसे मिळताच प्रियांश त्याच्या वडिलांसाठी आलिशान घर बनवणार आहे.
टीव्ही9 भारतवर्ष मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार प्रियांश आर्यचे कुटुंब भाड्याने राहत आहे. या 23 वर्षीय युवा फलंदाज खेळाडूचे आई-वडील शिक्षक आहेत आणि ते अजून पर्यंत घर खरेदी करू शकले नाहीत. आता समजले आहे की, पंजाब किंग्सने 3.8 करोड रुपयांना खरेदी केल्यामुळे लवकरच तो मोठं घर विकत घेऊ शकतो.
गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात 47 धावा केल्या होत्या. आयपीएल 2025 स्पर्धेने त्याला एक नवीन ओळख दिली आहे. त्याच्या आधी सुद्धा प्रियांशने भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळी केली होती. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दक्षिण दिल्ली संघासाठी खेळताना धमाकेदार शतक केले होते. तसेच पश्चिम दिल्ली विरुद्ध सामन्यात त्याने मनन भारद्वाजच्या 6 चेंडूत 6 षटकार झळकावले होते. या शानदार प्रदर्शनानंतर मेगा लिलावात पंजाब किंग्सने त्याला खरेदी केले.
प्रियांश आर्यच्या डोमेस्टिक करिअर बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये 19 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 620 धावा केल्या आहेत. प्रियांशने टी-20 करिअर मध्ये एक शतक आणि तीन अर्धशतक सुद्धा झळकावली आहेत. याशिवाय 7 लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर आतापर्यंत फक्त 77 धावा आहेत.