शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे यांनी घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ साठी रुद्रा रायडर्स हा संघ पुरस्कृत केला आहे. मुंबई विभागातून संघमालक आलेला एकमेव संघ आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजशे पाडावे याच्या प्रशिक्षकांना खाली अनेक राष्ट्रीय खेळाडु घडले आहेत.
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ मध्ये रुद्रा रायडर्सच्या प्रशिक्षकपदी उपनगरच्या नवरत्न क्रीडा मंडलचा तर व्यवसायिक एयर इंडियाचा खेळाडु सुदेश कुळे हे काम पाहणार आहेत. संघ व्यवस्थापकापदी रोशन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रुद्रा रायडर्सने नामदेव इस्वलकर या अनुभवी खेळाडूंवर लिलावतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात घेतले. घाटकोपर विभागातील शुभम शिंदे हा स्टार खेळाडु संघात आहे.
रुद्रा रायडर्स
1) शुभम शिंदे
2) सुजित खांडेकर
3) मयुर जाधव
4) किशोर उतेकर
5) राकेश कदम
6) सुरेश बहादूर
7) नामदेव इस्वलकर
8) नीरज विश्र्वकर्मा
9) विशाल काटकर
10) विकास चौरसिया
11) राज चव्हाण
12) दिपेश रामाणे
प्रशिक्षक: सुदेश कुळे
व्यवस्थापक: रोशन कदम