fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे’, एलपीएलमध्ये वादळी खेळी करणाऱ्या अष्टपैलूचे प्रतिपादन

thisara perera feels proud after matchwinning knock in lanka premier league 2020

November 30, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


लंका प्रीमिअर लीगच्या पाचव्या सामन्यात जाफना स्टॅलियन्सने दांबुला वीकिंग्सचा ६६ धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय मिळवला. कर्णधार थिसारा परेराच्या वादळी खेळीने जाफना स्टॅलियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विजयानंतर परेराने प्रतिक्रिया देताना म्हटले, कर्णधार म्हणून मी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे.

जाफना स्टॅलियन्सचा दणदणीत विजय

हंबनटोटा येथे झालेल्या पाचव्या सामन्यात जाफना स्टॅलियन्सने दांबुला वीकिंग्सचा ६६ धावांनी पराभव केला. परेराने अवघ्या ४४ चेंडूत ९७ धावांची तुफानी खेळी केली. यात ८ चौकार व ७ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. परेराच्या खेळीमुळे स्टॅलियन्सने २१८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, दांबुला वीकिंग्सचा संघ १५२ धावांवर बाद झाला. स्टॅलियन्सकडून उस्मान शेनवारी याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. परेराने गोलंदाजीतही दोन बळी आपल्या नावे केले. सलग दोन विजयांसह जाफना स्टॅलियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

मी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे

सामनावीर ठरलेल्या परेराने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “कर्णधार म्हणून केलेल्या अष्टपैलू कामगिरीचा मला अभिमान आहे. जेव्हा मी फलंदाजीसाठी उतरलो, तेव्हा मी निकालाबद्दल विचार केला नव्हता. आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. परंतु, आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या मैदानावर २०० धावांचा पाठलाग सहज करता येतो.”

जाफना स्टॅलियन्स गुणतालिकेत अव्वलस्थानी

परेराच्या नेतृत्वाखालील जाफना स्टॅलियन्सने गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात शाहिद आफ्रिदी नेतृत्त्व करत असलेल्या गाले ग्लेडिएटर्सचा पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत


Previous Post

‘भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?’, मांजरेकरांच्या ट्विटवर चाहत्याची तिखट प्रतिक्रिया

Next Post

‘रोहित खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही’, भारतीय दिग्गजांचे बीसीसीआयवर ताशेरे

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

'रोहित खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही', भारतीय दिग्गजांचे बीसीसीआयवर ताशेरे

Photo Courtesy: Twitter/ ICC

नियम मोडला.! 'या' पाकिस्तानी खेळाडूला क्रिकेट बोर्डाकडून थेट घरचा रस्ता

Screengrab:  Twitter/HeatBBL

Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.