आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती स्पर्धा सुरू होण्याची. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, २६ मार्चपासून मुंबई आणि पुण्यातील चार स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळले जातील. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने अनेक दिग्गज खेळाडूंना संघासोबत जोडले आहे. सामने सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघ सज्ज आहे. अशात काही विदेशी खेळाडू आहेत, जे दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच स्थान मिळवू शकतात. आपण या लेखात दिल्ली कॅपिटल्सच्या स्कॉडमधील ३ विदेशी खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) मागच्या हंगामापर्यंत सनरायझर्स हैदराबादमध्ये सहभागी होता. त्याच्या नेतृत्वात सनरायझर्सने २०१६ साली आयपीएलचे जेतेपद जिंकले. या विजयात वॉर्नच्या फलंदाजीचे योगदान महत्वाचे होते. असे असले, तरीही मागच्या हंगामात सनरायझर्सने वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि काही सामन्यातून त्याला बाहेरही ठेवले होते. अशात वॉर्नरने मेगा लिलावात सहभाग घेतला आणि दिल्लीने त्याला मोठी रक्कम खर्च करून खरेदी केले.
वॉर्नरचे आयपीएमधील आकडे खूपच अप्रतिम आहेत. त्याने खेळलेल्या १५० आयपीएल सामन्यांमध्ये ४१.५९ च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या. यामध्ये त्याचे ४ शतक आणि ५० अर्धशतक सहभागी आहेत. तो एक आयपीएलमधील यशस्वी विदेशी खेळाडू आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात वॉर्नर आणि भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामी करताना दिसू शकतात.
मिशेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिशेल मार्श (Mitchell Marsh) आयपीएल २०२२ हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि दैरा संपल्यानंतर मार्श आयपीएलमध्ये उपस्थित असेल. हा दौरा पाच एप्रिलला संपणार आहे. अशात असा अंदाज सांगितला जात आहे, जेव्हा तो खेळण्यासाठी उपलब्ध होईल, तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड केली जाऊ शकते. मार्शच्या आयपीएल प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून आतापर्यत २१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अवघ्या २२५ धावा केल्या आहेत. तसेच, २० विकेट्सही घेतल्या आहेत.
एन्रीच नॉर्किए
दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए (Anrich Nortje) मागच्या काही हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच घातक गोलंदाजी करत आला आहे. सर्वप्रथम दिल्लीने त्याला २०२० मध्ये एका बदली खेळाडूच्या रूपात संघात सामील केले होते, परंतु त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि सर्वांना हैराण केले होते. मागच्या दोन हंगामात त्याने १६ सामने खेळले आणि यामध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२० हंगामात दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नॉर्किएने मोलाचे योगदान दिले होते.
महत्वाच्या बातम्या –
आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा
“जडेजा बेन स्टोक्सपेक्षा खूप पुढे आहे”, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
एकावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?