इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला आपल्या पलटणमध्ये समाविष्ट केले होते. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या लिलावात त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत संघात स्थान देण्यात आले होते. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर,दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ज्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी, मुंबई इंडियन्स संघाने ७ सामने खेळले होते. या ७ पैकी एकही सामन्यात, अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की,त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी का देण्यात आली नाही. चला तर पाहूया त्याला संधी न मिळण्याची काही प्रमुख कारणे.
१) संघाच्या संतुलनात नव्हता फिट-
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ नेहमीच संतुलित प्लेइंग ११ सह मैदानात उतरला आहे.या संघात अर्जुन तेंडुलकरला अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. तसेच कायरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या अष्टपैलू खेळाडूंची तिकडी, गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. या तिघांपैकी एकाही खेळाडूला संघाबाहेर बसावे लागले असते, तर कदाचित अर्जुनला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळाली असती. परंतु असे होऊ शकत नाही कारण तिघेही खेळाडू संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक आहेत.
२)सैयद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत निराशाजनक कामगिरी-
याच वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत,अर्जूनने मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते.परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याला या स्पर्धेत २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने ६७ धावा देत २ गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करतांना त्याला अवघ्या ३ धावा करण्यात यश आले होते. हे देखील एक कारण असू शकते, ज्यामुळे त्याला मुंबई इंडियन्स संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले नाही.
३)ड्रेसिंग रूमचे वातावरण दाखवण्यासाठी दिले होते संघात स्थान-
आयपीएल लिलावात जेव्हा मुंबई इंडियन्स संघाने, अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हा अनेकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले होते. सैयद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने निराशाजनक कामगिरी केली असताना देखील त्याला संघात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी, मुंबई इंडियन्स संघातील संघ व्यवस्थापकांनी स्पष्ट केले होते की, या हंगामात अर्जुनला स्थान देण्यात आले आहे कारण त्याला ड्रेसिंग रूममधील वातावरण पाहता येईल. त्याला खेळाडूंसोबत राहून भरपूर काही शिकायला मिळेल.त्यामुळे आधीच स्पष्ट झाले होते की, अर्जुनला प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
नुसता पैसा!! विराट कोहलीपेक्षा दुप्पट कमावतात महागुरु रवी शास्त्री, पाहा किती आहे वार्षिक कमाई
जर तो तुझ्यासमोर आला तर धक्का मारुन खाली पाड, बांगलादेशच्या क्रिकेटपटूच्या अखिलाडूवृत्तीचा व्हिडिओ व्हायरल
WTC Final: भारताची ही जोडी खूपच खतरनाक, न्यूझीलंडच्या बड्या फलंदाजाने घेतली धसकी