भारतात सर्वत्र कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. मागील काही दिवसात क्रिडाक्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरात १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२१ दरम्यान ६८ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १५ जणांचा संघ जाहीर करण्यात आला होता. आता या संघातील ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येत आहे.
महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर नुकतेच बारामती येथे पार पडले होते. यानंतर १२ एप्रिल रोजी संघ विमानाने उत्तर प्रदेशला रवाना होणार होता. तत्पुर्वी या शिबिरातील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या बुधवारी (०७ एप्रिल) करण्यात आल्या होत्या. यातील तीन खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजत आहे.
लवकरच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या तीन खेळाडूंची दुसरी चाचणी केली जाणार आहे. त्यांचा हा अहवाल निगेटिव्ह आल्यास पुढे काय? हे अद्याप स्पष्ट नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू