भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 14 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील 22 नोव्हेंबरपासून कोलकातामधील इडन इडन गार्डन(Eden Gardens)स्टेडीयमवर होणारा दुसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र कसोटी सामना(Day-Night Test) असणार आहे.
भारताचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
68 हजार प्रेक्षक क्षमता असणाऱ्या इडन गार्डन स्टेडीयमवर या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित रहावे या आशेने प्रतिदिन तिकीटाचे दर(Ticket prices)50 रुपयापासून ठेवण्यात आले आहेत. 50 रुपयाचे सर्वात कमी किमतीचे तिकीट असेल.
याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचे(कॅब) सचिव अविषेक दालमिया म्हणाले, ‘प्रतिदिन तिकीटांचे दर 50, 100, 150 रुपये असतील. आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही यशस्वी होऊ.’
याबरोबर त्यांनी सांगितले की दिवस-रात्र कसोटीची सुरवात साधारणत: दुपारी 2.30 वाजता होते, पण कोलकाताला होणाऱ्या भारताच्या दिवस-रात्र कसोटीची सुरुवात दुपारी 1 किंवा 1.30 वाजता होईल.
याबद्दल कॅबने म्हटले आहे की संध्याकाळी पडणारे दव आणि प्रेक्षकांची सुविधा लक्षात घेता हा दिवस-रात्र कसोटी सामना दुपारी 1 किंवा 1.30 वाजता सुरु करण्यासाठी ते बीसीसीआयची परवानगी घेतील.
या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका होईल. त्यानंतर 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना इंदोरला पार पडले.






