पुणे। महाराष्ट्र क्रिडा यांच्या तर्फे आयोजित व इन्फोसिस रिक्रिएशन क्लब पुरस्कृत इन्फोसिस आंतर आयटी टी-20क्रिकेट स्पर्धेत सिनेक्रॅन संघाने आयबीएम संघाचा तर टीएटो संघाने टेक महिंद्रा संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
हिंजवडी फेज 2 येथील इन्फोसिस क्रिकेट मैदानावर सूरू असलेल्या या स्पर्धेत संघर्षपुर्ण लढतीत कार्तिक हिरपाराच्या 37 धावांच्या जोरावर सिनेक्रॅन संघाने आयबीएम संघाचा 4 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सिनेक्रॅन संघाने 20 षटकात 5 बाद 156 धावा केल्या. यात शाहिन शेखने 33 तर सिध्देश बेंथे याने 34 धावा करून कार्तिकला सुरेख साथ दिली. 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयबीएम संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 152 धावांत संपुष्टात आला. सिनेक्रॅन संघाच्या प्रतिक पांडा व रोहित बांदीवाडेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. कार्तिक हिरपारा सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत टीएटो संघाने टेक महिंद्रा संघाचा 3 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रशांत दुधाणेच्या 25 व धनाजी कलाकेच्या 13 धांवासह टीएटो संघाने 12 षटकात 9 बाद 72 धावा केल्या. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतना टेक महिंद्रा संघ 12 षटकात 4 बाद 69 धावांत गारद झाला. अभिषेक कौशिक सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
सिनेक्रॅन- 20 षटकात 5 बाद 156 धावा(कार्तिक हिरपारा 37(23), शाहिन शेख 33(41), सिध्देश बेंथे 34(24), सौरभ सिंग 15(16), संचित मेहता 2-32, किरण लगड 1-23) वि.वि आयबीएम- 20 षटकात 8 बाद 152(विजय कमाने 32(20), धरमवीर सिंग 28(15), प्रतिक धर 16(20), प्रतिक पांडा 2-36, रोहित बांदीवाडेकर 2-12) सामनावीर- कार्तिक हिरपारा
सिनेक्रॅन संघाने 4 धावांनी सामना जिंकला.
टीएटो- 12 षटकात 9 बाद 72 धावा(प्रशांत दुधाणे 25(26), धनाजी कलाके 13(8), विक्रम माळी 12(12), स्वप्निल सवागवे 3-11, सचिन कुलकर्णी 3-9) वि.वि टेक महिंद्रा- 12 षटकात 4 बाद 69 धावा(अंकीत ठाकरे 28(25), विजय चाफळे नाबाद 14(13), अभिषेक कौशिक 2-10, उमेश तोमर 1-8) सामनावीर- अभिषेक कौशिक
टीएटो संघाने 3 धावांनी सामना जिंकला.