वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून येईल.
या सामन्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारत सरकार व गुजरात सरकार यांनी मोठी तयारी केली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी, डीजीपी विकास सहाय, डीजीपी जीएस मलिक आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली आणि हा मोठा सामना कसा चांगल्या प्रकारे पार पाडता येईल याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले,
“स्टेडियमची सुरक्षा आणि शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामन्यादरम्यान सुमारे 4,000 होमगार्ड आणि 7,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. या जवानांव्यतिरिक्त, आम्ही तीन एनएसजी ‘हिट टीम’ आणि एक ड्रोन विरोधी टीम तैनात करू. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या नऊ पथकांचाही उपयोग केला जाईल. महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाचे चार वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त दर्जाचे 21 अधिकारी सामन्याच्या दिवशी कर्मचार्यांना मार्गदर्शन करतील.”
ते पुढे म्हणाले,
“राज्य राखीव पोलिसांच्या (एसआरपी) 13 कंपन्यांव्यतिरिक्त, आम्ही जलद कृती दलाच्या तीन कंपन्या तैनात करू. आरएएफ शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागांवर लक्ष ठेवेल. चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी आम्ही आधीच निर्वासन योजना तयार केली आहे आणि स्टेडियममध्ये त्याची तालीमही सुरू आहे.”
विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मधून भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे पाहिले जातेय. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी हा सामना होईल
(Tight Security For India Pakistan Match In Ahmedabad 11000 Plus Police And Army Ready)
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
‘सॉलिड’ समरविक्रमाने झोडली पाकिस्तानची गोलंदाजी, फक्त इतक्या चेंडूवर ठोकले शतक