आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (11 एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात कर्णधार रोहित शर्मा व युवा फलंदाज तिलक वर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या विजयानंतर बोलताना तिलक याने रोहित शर्माविषयी एक भावनिक प्रतिक्रिया दिली.
आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ या सामन्यात उतरला होता. विजयासाठी 173 धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित व ईशान किशन यांनी 71 धावांची सलामी दिली. ईशान बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा याला बढती दिली गेली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या तिलक याने हा विश्वास सार्थ ठरवला. त्याने रोहितला साथ देत दिल्लीच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 29 चेंडूवर 1 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. त्याला मुकेश कुमार याने बाद केले. त्याने रोहितसह दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली.
सामन्यानंतर बोलताना तिलक म्हणाला,
“खऱ्या अर्थाने आज माझे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणापासून मी हेच स्वप्न पाहिले होते की मी रोहित शर्मासोबत एक दिवस फलंदाजी करेल. ती संधी मला मिळाली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”
तिलक मागील वर्षीपासून मुंबई इंडियन संघाचा सदस्य आहे. मात्र, मागील हंगामात त्याला रोहितसोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. रोहित सलामीला फलंदाजीला येत असल्याने आणि तिलक पाचव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने त्यांना एकत्रित फलंदाजी करता आली नाही. मात्र, या सामन्यात तिलकला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्याने या दोघांनी प्रथमच एकसाथ फलंदाजी करताना संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिलक्नेहंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध देखील 83 धावांची नाबाद खेळी केली होती.
(Tilak Varma Said My Dream Come True After Batting With Rohit Sharma For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम