fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 211 धावांची द्विशतकी खेळी केली. तसेच कर्णधार टिम पेनने स्मिथबरोबर 145 धावांची भागीदारी करताना 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.

पेनने या अर्धशतकी खेळीबरोबरच एक खास पराक्रम केला आहे. तो ऍशेस मालिकेत अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच यष्टीरक्षक-कर्णधार ठरला आहे.

याआधी असा पराक्रम जॅक ब्लॅकहॅम यांनी डिसेंबर 1894 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षणाबरोबरच कर्णधारपद सांभाळताना केला आहे. त्यांनी त्यावेळी सिडनी येथे 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तब्बल 125 वर्षांनी पेनने ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम केला आहे.

त्याचबरोबर पेन हा ऍशेस मालिकेत अर्धशतक करणारा एकूण तिसराच यष्टीरक्षक-कर्णधार आहे. ऍशेसमध्ये ब्लॅकहॅम यांच्यानंतर 1998 मध्ये इंग्लंडचे नेतृत्व करताना यष्टीरक्षक ऍलेक स्टिवर्ट यांनी ऍडलेड येथे नाबाद 63 धावांची खेळी केला होती.

सध्या सुरु असलेल्या 2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऍशेसमध्ये यष्टीरक्षक-कर्णधार म्हणून अर्धशतक करणारे क्रिकेटपटू – 

जॅक ब्लॅकहॅम (ऑस्ट्रेलिया) -74 धावा, सिडनी – डिसेंबर 1894

ऍलेक स्टिवर्ट (इंग्लंड) – 63* धावा, ऍडलेड – डिसेंबर 1998

टिम पेन (ऑस्ट्रेलिया) – 58 धावा, मँचेस्टर –  सप्टेंबर 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम

‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

You might also like