Loading...

तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या समावेशाबद्दल ही आहे मोठी बातमी

रविवारी(18 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. मात्र या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला आहे.

त्याला शनिवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात152 चेंडूत 80 धावांवर फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला.

त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. पण नंतर तो एक विकेट गेल्यानंतर पुन्हा फलंदाजीला आला. मात्र तो 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर तो पाचव्यादिवशी मैदानात उतरला नाही.

त्याच्या या दुखापतीमुळे 22 ऑगस्टपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण त्याच्या उपलब्धतेबद्दल काही सांगणे घाई करण्यासारखे असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने म्हटले आहे.

सामन्यानंतर रविवारी पेन म्हणाला, ‘तो काल ठिक होता. पण सकाळी उठल्यानंतर त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याला आज न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मिथने त्याच्या वैद्यकिय तपासण्या पास केल्या होत्या.’

Loading...

‘पण त्याची तब्येत रात्री खालावली. त्याला पुन्हा एकदा तपासण्यात आले. आज सकाळी केलेल्या या तपासण्या खूप चांगल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला उर्वरित सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला बरा होण्यासाठी वेळ लागेल. पण याबद्दल काही भाष्य करणे घाईचे ठरेल.’

स्मिथ दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याने त्याच्याऐवजी आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे फलंदाज मार्नस लाब्यूशानेची ऑस्ट्रेलियाने चालू सामन्यात बदली खेळाडू म्हणून निवड केली. लाब्यूशानेनेही त्याची निवड योग्य ठरवत दुसऱ्या डावात 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना अनिर्णित राखण्यात मदत झाली.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी झालेल्या मुलाखतीत तो प्रश्न विचारलाच

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सध्या कुणाचे किती आहेत गुण?

सोशल मीडियावरील विराटच्या फाॅलोवर्सचा आकडा ऐकून अवाक व्हालं!

You might also like
Loading...