कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना खऱ्या अर्थाने संयमाची परीक्षा पाहिली जाते. कसोटी सामन्यांमध्ये षटकारांचा पाऊस क्वचितच पडतो. मात्र, काही खेळाडू क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात फलंदाजी करताना आक्रमक वृत्ती दर्शवितात. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकीर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत.
दुसरीकडे, आपण सध्याच्या सक्रिय खेळाडूंबद्दल बोललो तर इंग्लंडचा बेन स्टोक्स या यादीत अव्वल आहे. एवढेच नव्हे तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीही या शर्यतीत रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांपेक्षा पुढे आहे. कसोटीत क्रिकेटमध्ये सक्रिय असणार्या आणि ५० पेक्षा अधिक षटकार ठोकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
बेन स्टोक्स
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स या यादीत अव्वल आहे. स्टोक्सने आतापर्यंत ७१ कसोटी सामन्यांच्या १३० डावात ७९ षटकार ठोकले आहेत. तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील आहे.
टिम साऊदी
स्टोक्सनंतर दुसर्या क्रमांकावर अत्यंत धक्कादायक नाव आहे. कारण, हे नाव न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी याचे आहे. त्याने ७७ कसोटी सामन्यांच्या १०९ डावात ७३ षटकार लगावले आहेत.
अँजेलो मॅथ्यूज
श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यूजने ९० कसोटी सामने खेळले असून, यामध्ये त्याने १६१ डावात ६३ षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा
मॅथ्यूजनंतर या यादीमध्ये रोहित शर्माचा क्रमांक लागतो. या दिग्गज भारतीय फलंदाजाने कसोटीत सर्वात वेगवान ५० षटकार पूर्ण केले आहेत. आतापर्यंत ३८ कसोटी सामन्यात त्याने फक्त ६३ डावात ५९ षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.
डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसुद्धा या यादीत आहे. वॉर्नरने ८६ कसोटी सामन्यांच्या १५९ डावात ५६ षटकार ठोकले आहेत. वॉर्नर जवळपास एक वर्ष ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर होता. अन्यथा तो या यादीमध्ये काही वरच्या क्रमांकावर दिसण्याची शक्यता होती.
रॉस टेलर
न्यूझीलंडचा व पर्याय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलरही या यादीमध्ये समाविष्ट आहे. टेलरने १०५ कसोटी सामने खेळून १८३ डावात ५३ षटकार ठोकण्याची कामगिरी केली.
रवींद्र जडेजा
सध्याच्या कसोटी फलंदाजांमध्ये ५० षटकार मारणारा अखेरचा फलंदाज भारताचा सुपरस्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे. जडेजाने ५१ कसोटी सामन्यांच्या ७३ डावात ५० षटकार खेचले आहेत. दुसरीकडे, भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ९१ कसोटी सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत केवळ २२ षटकार त्याच्या खात्यात जमा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत
संकटमोचक यूएई! तिसऱ्यांदा भूषवणार आयपीएलचे यजमानपद, दोन वेळा ‘या’ कारणाने झाले होते आयोजन
“काही क्षण तुमच्याबरोबर कायम राहतात”, सौरव गांगुली ‘तो’ जुना फोटो शेअर करत झाला भावूक