fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुफानी फटकेबाजी! मुंबई इंडियन्सच्या पोलार्डने शाहरुखच्या टीमला मिळवून दिला एकहाती विजय

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2020) मध्ये वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डचा जोरदार धमाका सुरू आहे. शनिवारी बार्बाडोस ट्रायडंट्स विरुद्ध ट्रिंबँगो नाइट रायडर्स यांच्यात सामना झाला. ट्रिंबँगो नाइट रायडर्सचा कर्णधार पोलार्डने अवघ्या 28 चेंडूत 72 धावा फटकावल्या. 149 धावांच्या धावांचा पाठलाग करताना पोलार्डची खेळी निर्णायक ठरली आणि बार्बाडोसवर 2 गडी राखून ट्रिंबँगोने विजय नोंदविला.

पोलार्ड 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा नाईट रायडर्सने 62 धावांत 5 गडी गमावले होते आणि केवळ 7.2 षटके शिल्लक होती, म्हणजे नाईट रायडर्सला उर्वरित  44 चेंडूत  87 धावांची आवश्यकता होती. पोलार्डने कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मैदानावर आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 28 चेंडूत 9 षटकार आणि 2 चौकार ठोकले.

टीकेआरला अंतिम 2 षटकांत 31 धावांची आवश्यकता होती, 19 व्या षटकात बार्बाडोसचा कर्णधार जेसन होल्डर गोलंदाजीसाठी आला. पोलार्डने त्याच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले आणि या षटकात एकूण 16 धावा केल्या.

सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवरही त्याने आर. रेफरचे षटकार मारून स्वागत केले. मात्र तो दुसर्‍या चेंडूवर पोलार्ड धावबाद झाला, तेव्हा टीकेआरची टीम विजयापासून 8 धावा दूर होती.  बाकीचे काम कॅरी पियरे आणि जेडन सीन यांच्या जोडीने पूर्ण झाले.

तत्पूर्वी, बार्बाडोसने जॉनसन चार्ल्स (47) आणि कायल मेयर्स (42) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या बदल्यात 20 षटकांत 7 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या.


Previous Post

या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार

Next Post

आयपीएलमधून बाहेर पडलेल्या जिगरी दोस्त रैनासाठी इरफानचा भावुक संदेश, मित्रा…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Next Post

आयपीएलमधून बाहेर पडलेल्या जिगरी दोस्त रैनासाठी इरफानचा भावुक संदेश, मित्रा...

स्टोक्सचे तीन बोटांचे सेलिब्रेश होते कर्करोग झालेल्या त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी

अर्जुन पुरस्कार मिळताच भारताच्या सर्वात अनुभवी क्रिकेटरने केले निवृत्तीबद्दल भाष्य

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.