भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी टी-२० विश्वचषकानंतर त्यांच्या पदावर कार्यरत राहणार नाहीत. त्यांचा या पदासाठीचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्रींनंतर या पदाची जबाबदारी कोण घेणार, याबाबत चर्चा होते आहे. या पदासाठी अनेक भारतीय दिग्गजांसोबतच परदेशी दिग्गजांचीही नावे समोर आली आहेत. आता या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांचे नाव पुन्हा एकदा समोर आले. टॉम मूडी यांनी यापूर्वीही बऱ्याचदा या पदासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांची एकदाही नियुक्ती करण्यात आली नाही.
अशातच आस्ट्रेलियाचा हा दिग्गज रवी शास्त्रींनंतर या पदासाठी पुन्हा एकदा अर्ज करेल असा सर्वांचा अंदाज आहे आणि याबाबत माहितीही समोर आली आहे. मूडी यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक होते, पण २०१६ मध्ये फ्रेंचायझीने त्यांना या पदावरून हटवले होते. ते सध्या हैदराबाद संघाच्या संचालकाच्या रूपात काम करत आहेत.
मूडींनी ज्यावेळी २००५ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाच्याच ग्रेग चॅपलने या शर्यतीत मात दिली होती. या शर्यतीत ग्रेग चॅपलने त्यांना मागे टाकल्यानंतर त्यांना पराभव सहन झाला नव्हता. त्यांनी या घटनेनंतर, आता त्यांना या पदाच्या नियुक्तीसाठी विचारले गेले तरीही ते यासाठी नकार देतील, असे सांगितले होते.
मूडीने याव्यतिरिक्त यापूर्वीही भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी २०१७ आणि २०१९ मध्येही अर्ज केला होता. पण यावेळीही बीसीसीआयने त्यांच्या नावावर विचार केला नव्हता.
परंतु माध्यमांतील वृत्तांनुसार समजते की, वार्नरला आयपीएलच्या चालू हंगामाच्या सुरुवातीला कर्धधारपदावरून आणि दुसऱ्या टप्प्यात प्लेइंग इलेव्हनमधून हटवण्यामागचे एकमेव कारण मूडीला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायचे आहे, असे समजत आहे.
मूडी यापूर्वी श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत आणि त्यांनी संघाला २००७ विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर त्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले होते. मूडींनी आयपीलमध्ये हैदराबाद व्यतिरिक्त पंजाब किंग्ज संघालाही प्रशिक्षण दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवीकोरी जर्सी लाँच, जुन्या जर्सीपेक्षा ‘अशी’ आहे वेगळी
दिल्ली वि. कोलकाता दुसऱ्या क्वालिफायरसाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही शंका, टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयची ‘या’ धाकड अष्टपैलूवर नजर