---Advertisement---

महिला टी२० विश्वचषकातील या आहेत भारताच्या टॉप ३ फलंदाज

On: रविवार, मार्च 8, 2020 9:58 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज ८ मार्चला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तसेच भारताच्या युवा फलंदाजही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

जाणून घेऊयात भारताच्या टॉप 3 फलंदाजांबद्दल….

  1. शेफाली वर्मा :-  शेफाली वर्माने विश्वचषकाच्या 4 सामन्यात 40.25च्या सरासरीने 161 धावा केल्या असून त्यात 18 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे. योगायोगाने तिचा स्ट्राईक रेटसुद्धा 161 आहे. ती विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तिने श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक 47 धावांची खेळी केली होती.
  2. जेमिमाह रॉड्रिग्ज :-  रॉड्रिग्जने 4  सामन्यात  28.33च्या सरासरीने 85 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. तिचा स्ट्राईक रेट 96.51 असा आहे. तिने बांगलादेश विरुद्ध 34 धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती.
  3. दिप्ती शर्मा :- दिप्तीने या विश्वचषकात शानदार अष्टपैलू कामगिरी करताना 4 सामन्यात 41.50च्या सरासरीने 83 केल्या आहेत. यात तिने 5 चौकार मारले आहेत. तिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यातच नाबाद 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकात टीम इंडियासाठी हे ५ टप्पे ठरले महत्त्वाचे!

भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणाऱ्या विश्वचषक फायनलबद्दल सर्वकाही…

टाॅप ४- रॉस टेलरसह या तीन खेळाडूंनी केल्या आहेत वाढदिवसाच्या दिवशीच शतकी खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---