fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स

इंडियन प्रीमीयर लीगची (आयपीएल) लोकप्रियता भारतात मोठी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये होणाऱ्या विक्रमांचीही जोरदार चर्चा होत असते. त्याचबरोबर आयपीएल म्हटले की एमएस धोनीची, तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये कायम विराट कोहली, सुरेश रैनाची चर्चा होत असते.

पण या लेखात आयपीएलमध्ये सर्वाधिक सामानावीर पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामानावीर पुरस्कार मिळवणारे ३ खेळाडू – 

३. डेव्हिड वॉर्नर – १७ सामनावीर पुरस्कार

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाद सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमझध्ये आत्तापर्यंत १७ सामन्यांत सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. वॉर्नर सध्या सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतो.

तसेच काही दिवसांपूर्वीच त्याला या संघाचे कर्णधारपदही पुन्हा देण्यात आले आहे. याआधी २०१६ ला त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबादने आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीतही चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू देखील आहे.

त्याने आयपीएलमध्ये १२६ सामन्यात ४३.१७ च्या सरासरीने ४७०६ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ४ शतकांचा आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १२६ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

वॉर्नर २०१४ पासून सनरायझर्स हैद्राबादकडून खेळत आहे. त्याआधी तो ५ मोसम दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला आहे. तो २०१८ ला झालेल्या मोसमात चेंडू छेडछाडीमुळे आलेल्या बंदीमुळे खेळला नव्हता. परंतू त्याला या मोसमानंतर हैद्राबादने संघात कायम केले आहे.

त्याने २०१९च्या मोसमातून आयपीएलमध्ये पुनरागम करताना ६९.२० च्या सरासरीने तब्बल ६९२ धावा ठोकल्या. तो २०१५, २०१७ आणि २०१९ या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

२. एबी डिविलियर्स – २० सामनावीर पुरस्कार

‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या एबी डिविलियर्सने आत्तापर्यंत २० वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या डिविलियर्स रॉयल चॅलेंजर्स संघाचा भाग आहे.

डिविलियर्सने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५४ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये मिळून त्याने ३९.९५ च्या सरासरीने ४३९५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये नाबाद १३३ धावांची सर्वोच्च वैयक्तित खेळी केली आहे.

डिविलियर्स आत्तापर्यंत झालेल्या सर्व १२ आयपीएल मोसमात खेळला आहेत. तो पहिले ३ मोसम दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला. नंतर २०११ पासून तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत असून तो त्यांचा महत्त्वाचा भाग आहे.

१. ख्रिस गेल – २१ सामनावीर पुरस्कार 

युनिवर्स बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २१ सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारा खेळाडू आहे.

नेहमीच उंच आणि लांबलचक षटकार खेचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १२५ सामने खेळले असून यात त्याने ४१.१३ च्या सरासरीने ४४८४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे तो अनेकदा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमीका पार पाडत असतो.

त्याने २०१३ च्या मोसमात २३ एप्रिलला पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध बंगळुरु येथे खेळतान ६६ चेंडूत वेगवान १७५ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये केलेल्या या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.

गेल हा २०१८पासून किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. त्याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

ट्रेडिंग घडामोडी –

हर्षा भोगले असे काय बोलले, ज्यामुळे धोनीचे चाहते झाले नाराज

विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी

टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक

वसिम जाफरच्या आयपीएल ड्रीम ११चा धोनी कर्णधार, बाकी १० खेळाडू आहेत असे

५ असे विक्रम, जे अजूनही वनडे क्रिकेटमध्ये कुणी केले नाहीत

You might also like