यावर्षीतील सर्व संघाचे सामने संपले असल्याने आपल्याला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाजही मिळाले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आहे.
2019 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दोन भारतीय, एक वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचा फलंदाजाचा समावेश आहे.
हे आहेत यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
1. रोहित शर्मा – रोहित शर्माने यावर्षी 28 वनडे सामने खेळताना 57.30 सरासरीने 1490 धावा केल्या आहेत. रोहितने यावर्षी वेस्टइंडीज विरूद्ध 159 धावांची खेळी खेळली होती. ही वनडेतील यावर्षीची भारतीय क्रिकेटपटूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.
तसेच ही खेळी रोहितची या वर्षातील सर्वोत्तम खेळी आहे. तसेच रोहितने यावर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या विश्वचषकात 5 शतके ठोकले आहेत. विश्वचषकात 5 शतक ठोकणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.
2. विराट कोहली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 26 वनडे सामन्यात 59.86 सरासरीने 1377 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 7 अर्धशतकाचा समावेश आहे.
विराटने न्यूझीलंड विरूद्ध 123 धावांची खेळी खेळली. यावर्षातील ही विराटची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.
3. शाय होप – वेस्टइंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज शाय होपने 28 वनडे सामन्यात 61.13 च्या सरासरीने 1345 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकाचा आणि 8 अर्धशतकाचा समावेश आहे.
शाय होपने आयर्लंड विरूद्ध 170 धावांची खेळी खेळली यावर्षातील ही होपची सर्वोत्तम खेळी ठरली.
4. ऍरॉन फिंच– ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकाचा कर्णधार ऍरॉन फिंचने 23 वनडे सामन्यात 51.86 सरासरीने 1141 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकाचा आणि 6 अर्धशतकाचा समावेश आहे.
फिंचने श्रीलंकाविरूद्ध 153 धावांची नाबाद खेळी खेळली यावर्षातील ही फिंचची सर्वोत्तम खेळी आहे.
5.बाबर आजम- पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजमने 20 वनडे सामन्यात 60.66 सरासरीने 1092 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
यावर्षात बाबरने श्रीलंकेविरूद्ध 115 धावांची खेळी खेळली.या वर्षातील ही बाबरची सर्वोत्तम खेळी ठरली.
२०१९ वर्षातील हे आहेत सर्वोत्तम ५ झेल
वाचा????https://t.co/VEPHmkzMjZ????#Cricket #TeamIndia #म #मराठी #वर्ष2019— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019
२०१९ मध्ये क्रिकेट वर्तुळात या ५ घटनांवर रंगल्या सर्वाधिक चर्चा
वाचा????https://t.co/fgFrbvMaOe????#Cricket #TeamIndia #म #मराठी #वर्ष2019— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019