मुंबई । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात चंद्रिका जोशी, भूमिका त्रिपाठी यांनी, तर मुलांच्या गटात क्रिशन हुडा, देवेश पहूजा, अर्जुन कुंडू या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 16वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित चंदीगडच्या क्रिशन हुडाला हरियाणाच्या पर्व नागेला कडवी झुंज दिली.
क्रिशन हुडाने पर्व नागेवर 6-1, 4-6, 6-2असा विजय मिळवला. हरियाणाच्या देवेश पहूजाने महाराष्ट्राच्या अर्जुन शिरगांवकरचा टायब्रेकमध्ये 7-6(0), 7-5असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. गुजरातच्या अर्जुन कुंडूने दिल्लीच्या कनिष्क पालचे आव्हान 6-3, 7-6(3)असे मोडीत काढले.
मुलींच्या गटात कर्नाटकाच्या चंद्रिका जोशी हिने पश्चिम बंगालच्या शतवीसा घोषचा 3-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तामिळनाडूच्या श्रीचंद्रा टेंटूने तेलंगणाच्या आदिती अरेचा 6-3, 3-6, 6-1असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. महाराष्ट्राच्या भूमिका त्रिपाठीने आपलीच राज्य सहकारी इशिता जाधवचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4)असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले: क्रिशन हुडा(चंदीगड)(1)वि.वि.पर्व नागे(हरियाणा)6-1, 4-6, 6-2; मानव जैन(गुजरात)वि.वि.करण सिंग(हरियाणा)7-5, 6-2; मोहित बोन्द्रे(गुजरात)(16)वि.वि.कार्तिक सक्सेना(दिल्ली) 6-4, 6-0; देवेश पहूजा(हरियाणा)वि.वि.अर्जुन शिरगांवकर(महा)7-6(0), 7-5; अर्णव पतंगे(कर्नाटक)(6)वि.वि.शशीधर कोटा(तेलंगणा) 6-1, 6-1;सुशांत दबस(हरियाणा)(3)वि.वि.प्रांजल तिवारी(मध्यप्रदेश)6-4, 6-1; भूपेंदर दहिया(चंदीगड)(8)वि.वि.शशांक नरडे(कर्नाटक)6-2, 6-1; दिवेश गेहलोट(हरियाणा)(4)वि.वि.आकाश देब(आसाम)6-4, 6-4; अर्जुन कुंडू(गुजरात)वि.वि.कनिष्क पाल(दिल्ली)6-3, 7-6(3);
16वर्षाखालील मुली: श्रेया चक्रवर्ती(पश्चिम बंगाल)वि.वि.माही पांचाळ(गुजरात)6-1, 6-3;ऋतुजा चाफळकर(महा)वि.वि.रेश्मा मारुरी(कर्नाटक)6-0, 6-4; चंद्रिका जोशी(कर्नाटक)वि.वि.शतवीसा घोष(पश्चिम बंगाल)3-6, 6-1, 6-3;श्रीचंद्रा टेंटू(तामिळनाडू)वि.वि.आदिती अरे(तेलंगणा)6-3, 3-6, 6-1; भूमिका त्रिपाठी(महा)वि.वि.इशिता जाधव(महा)6-3, 7-6(4); संजना सिरीमल्ला(तेलंगणा)वि.वि.अमिक बाठ(ओरिसा)6-2, 6-0;वैष्णवी आडकर(महा)वि.वि.जनिता असापु(आंध्रप्रदेश)6-1, 6-0;विपाशा मेहरा(तामिळनाडू)वि.वि.अवी शहा(गुजरात)6-1, 6-2.