जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच पहिला दिवस बुधवारी (7 जून) पार पडला. उभय संघांतील हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांच्या योगदानामुळे संघ 300 धावांचा आकडा पार करू शकला. पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकावलेल्या हेडने दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन फलंदाज 76 धावांवर माघारी पाठवले होते. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हेडने भारतीय गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले. त्याने अगदी वनडे स्टाईल फलंदाजी करताना जलद गतीने धावा काढण्यास सुरुवात केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवत 106 चेंडूवर शतक पूर्ण केले. त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहत 156 चेंडूत 146 धावा केल्या. यामध्ये 22 चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर बोलताना तो म्हणाला,
“नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात अपेक्षित होती. वॉर्नर व मार्नसने तो कठीण काळ चांगल्या पद्धतीने खेळून काढला. त्यामुळे मला खेळण्याची स्वातंत्र्य मिळाले. काही चेंडूंनी माझी परीक्षा घेतली मात्र त्यातून पुढे जात माझी खेळी मी पुढे नेली. स्मिथसोबत फलंदाजी करण्याचा मी नेहमी आनंद घेत असतो. परिस्थितीनुसार खेळ चालवण्यात तो माहिर आहे.”
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 3 विकेट्सच्या नुकसानावर 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी एकूण 85 षटकांचा खेळ होऊ शकला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
(Travis Head Speaks After Day One Century In WTC Final 2023 Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट