आजपासून त्रिनिदाद मध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० ला सुरुवात होत आहे. पहिल्याच सामन्यांत सीपीएल इतिहासातील मधील दोन सर्वोत्तम संघ असलेल्या त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्स हे एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना त्रिनिदाद मधील ब्रायन लारा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही काळ क्रिकेटचे सामने खेळवले गेले नाहीत तसेच त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा देखिल पुढे ढकलण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात झाल्यानंतर सीपाएल सारखी नावाजलेल्या टी-२० स्पर्धेचा आजपासुन शुभारंभ होत आहे त्यामुळे क्रिकेट रसिकांना याचा आनंद घेता येणार आहे. तसेच कोरोना मुळे यावर्षीची संपुर्ण स्पर्धा प्रेक्षकांशिवाय त्रिनिदाद व टोब्रगोमध्येच सर्व सामने खेळविण्यात येणार आहेत. त्रिनिदाद व टोबॅगोमधील ब्रायन लारा क्रिकेट ऍकॅडमी व क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर या दोन मैदानावरच सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
दोन्ही संघांचा विचार करता किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात खेळणारा त्रिनबॅगो नाईट रायडर्सच्या संघात ड्वेन ब्राव्हो, सुनिल नारायण, कॉलिन मुनरो व लेंडल सिमन्स यांसारख्या तगड्या खेळाडुंचा भरणा आहे तर दुसरीकडे सीपीएल २०१९ चा उपविजेता ठरलेल्या गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या संघात निकोल्स पुरन, शिमरॉन हेटमायर, बेंडन किंग या युवा खेळाडुंसोबतच रॉस टेलर, इम्रान ताहीरचाही समावेश आहे पण तरी देखील कागदावर मात्र त्रिनबॅगो नाईट रायडर्सचा संघ मात्र वरचढ वाटतो आहे.
ड्रीम ११ – लेंडल सिमन्स (कर्णधार), निकोल्स पुरन (उपकर्णधार), बेंडन किंग, कॉलिन मुनरो, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, सुनिल नारायण, इम्रान ताहीर, अली खान,कॅरी पिर,रोमारियो शेफर्ड
संभावित संघ-
त्रिनबॅगो नाईट रायडर्स – किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनिल नारायण, लेंडल सिमन्स, कॉलिन मुनरो, टिम सेईफर्ट, डॅरेन ब्राव्हो, ड्वेन ब्राव्हो, अली खान, कॅरी पिर, फवाद अहमद,जेडेन सिल्स
गयाना ऍमेझॉन वॉरियर्स– ख्रिस ग्रिन (कर्णधार), निकोल्स पुरन, ब्रेंडन किंग, शिमरॉन हेटमायर, रॉस टेलर, चंदकपॉल हेमराज,शेर्फन रुदरफोर्ड, किमो पॉल, इम्रान ताहिर, रोमारियो शेफर्ड,नवीन उल हक