पुणे । ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ट्रिनिटी निमंत्रित क्रिकेट करंडक २०१८ स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सत्यम व्हेकेशन संघाचा एक डाव व ४९ धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
के.जे इन्स्टिटयूट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात युनियन क्रिकेट क्लब संघाने पहिल्यांदा खेळताना ८४.४ षटकात २९३धावा धावांचे आव्हान उभे केले.
यात वेंकटेश ओ. ५९, सुरज सर्वे ५०, सागर मगर ४९, अजिंक्य थिटे ३८, जयेश मयरमानी ३१, हितेन बनसोडे १५ यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. सत्यम व्हेकेशनकडून चंद्रकांत भारद्वाज(२-१८), संजय जोशी(२-७४), आदिनाथ गायकवाड(२-६८)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सत्यम व्हेकेशन संघाचा डाव २८.२ षटकात १०२धावावर गारद झाला.
यामध्ये प्रसन्ना मोरे २०, चंद्रकांत भारद्वाज १५, समीर सिंग १४, संजय जोशी १३, आनंद अभिषेक १२ यांनी थोडासा प्रतिकार केला. युनियन क्रिकेट क्लबकडून हितेन बनसोडे(४-३६), अमरजीत चव्हाण(२-२), वेंकटेश ओ.(२-१२) यांनी अफलातून गोलंदाजी करत सत्यम व्हेकेशन संघाला १०२ धावांवर रोखले व संघाला १९१धावांची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात १९१धावांचा पाठलाग करताना सत्यम व्हेकेशन संघ ३२.४षटकात १४२धावावर संपुष्टात आला. यात सुरज शिंदे ५१, समीर सिंग ३०, चंद्रकांत भारद्वाज १६ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. युनियन क्रिकेट क्लबकडून वेंकटेश ओ.(२-२२), संकेत जावरे(२-३०), अमरजित चव्हाण (२-३८), जयेश मयरमनी(१-४)यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाला ४९ धावांनी विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: युनियन क्रिकेट क्लब: ८४.४ षटकात सर्वबाद २९३धावा(वेंकटेश ओ. ५९, सुरज सर्वे ५०, सागर मगर ४९, अजिंक्य थिटे ३८, जयेश मयरमानी ३१, हितेन बनसोडे १५, चंद्रकांत भारद्वाज २-१८, संजय जोशी २-७४, आदिनाथ गायकवाड २-६८)वि.सत्यम व्हेकेशन: २८.२ षटकात सर्वबाद १०२धावा(प्रसन्ना मोरे २०, चंद्रकांत भारद्वाज १५, समीर सिंग १४, संजय जोशी १३, आनंद अभिषेक १२, हितेन बनसोडे ४-३६, अमरजीत चव्हाण २-२, वेंकटेश ओ. २-१२); पहिल्या डावात युनियन क्रिकेट क्लबकडे १९१धावांची आघाडी;
दुसरा डाव: सत्यम व्हेकेशन: ३२.४षटकात सर्वबाद १४२धावा(सुरज शिंदे ५१, समीर सिंग ३०, चंद्रकांत भारद्वाज १६, वेंकटेश ओ. २-२२, संकेत जावरे २-३०, अमरजित चव्हाण २-३८, जयेश मयरमनी १-४); युनियन क्रिकेट क्लब ४९धावा व एक डाव राखून विजयी.