fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अशी वाढदिवसाची भेट आजपर्यंत कोणत्याच खेळाडूला मिळाली नसेल!!

सोमवारी(२७ एप्रिल) ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गियोसने त्याचा २५ वा वाढदिवस साजरा केला. पण त्याला त्याच्या वाढदिवसाची एक अनपेक्षित भेट ग्रिसचा २१ वर्षीय टेनिसपटू स्टिफानोस स्तिस्तिपासकडून मिळाली आहे.

जागतिक क्रमवारीत ६ व्या क्रमांकावर असणाऱ्या स्टिफानोसने इंस्टाग्रामवर एक फोन नंबर लिहिलेला एक कार्डबोर्ड पेपर हातात घेऊन स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी उत्साहाने त्या क्रमांकावर फोन लावून पाहिले. पण काहीवेळातच तो क्रमांक बंद झाल्याचे आढळून आले. तसेच तो क्रमांक किर्गियोसशी जोडलेला असल्याचेही लक्षात आले.

याबद्दल किर्गियोसनेच पृष्टी दिली. त्याने स्टिफानोसच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की ‘तू खरंच वेडा आहे. सर्वांनी कृपा करुन मला फोन करणे थांबवा.’

त्याचबरोबर किर्गियोसने इंस्टाग्राम स्टोरी टाकत म्हटले आहे की ‘मी समजू शकतो माझा वाढदिवस आहे. स्टिफानोसने माझा नंबर पोस्ट केला आहे. पण कृपा करुन मला फोन करणे थांबवा. मला काही करता येत नाहीये.’

किर्गियोस सध्या जागतिक क्रमवारीत ४० व्या क्रमांकावर आहेत. तसेच किर्गियोस आणि स्टिफानोस मागीलवर्षी सिटी ओपन स्पर्धेत दुहेरी गटात खेळताना एकमेकांचे जोडीदार होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

थेट त्या खेळाडूच्या बापाने युवराजला म्हटले, तु माझ्या मुलाचे करियर खराब केले

१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या

धोनी- विराटची २०१९सालची कमाई आली जगासमोर, कमी सामने खेळूनही धोनी आहे…

You might also like