पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स या संघानी आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत श्रीनिवास चाफळकर(47धावा व 2-5)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टस्कर्स संघाने बुल्स संघाचा 17धावांनी पराभव करून तिसरा विजय मिळवला. रवींद्र कासट 26धावांच्या खेळीच्या जोरावर जॅगवॉर्स संघाने कोब्राज संघाचा 5 गडी राखून पराभव करत तिसरा विजय नोंदविला.
गौरव सावगावकर(1-11 व 26धावा)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने टायगर्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.
गतविजेत्या पँथर्स संघाने रायनोज संघाचा केवळ 3धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. रवींद्र कासट याने केलेल्या 25 धावांच्या खेळीच्या जोरावर जॅगवॉर्स संघाने हॉग्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
टस्कर्स: 6षटकात 3बाद 61धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 47(20,4×4,3×6), पिनाकिन मराठे 1-4, सुमेध गांगल 1-6, सिद्धांत चोपडा 1-7) वि.वि.बुल्स: 6षटकात 7बाद 44धावा(पराग चोपडा 20, सुमेध गांगल 11, श्रीनिवास चाफळकर 2-5, हर्षल गंद्रे 1-5, ईशान भाले 1-9, रणीत जैन 1-4);सामनावीर-श्रीनिवास चाफळकर;
कोब्राज: 6षटकात 2बाद 52धावा(प्रतीक वांगीकर 24(14,4×4), विशाल गोखले 17(16,2×4), तन्मय चोभे 1-8, सुमेध शहा 1-5)पराभूत वि.स्कॅवेंजर्स: 5.4षटकात 3बाद 55धावा(नंदन डोंगरे नाबाद 22(15, 3×4), तन्मय चोभे 10, असिम देवगावकर 1-6, समीर जोग 1-12, प्रतीक वांगीकर 1-8);सामनावीर-नंदन डोंगरे;
पँथर्स: 6षटकात 3बाद 66धावा(आशिष देसाई 19(11), अनुज मेहता नाबाद 18, प्रेरित गोयल 14, राघव बर्वे 1-7, अमित परांजपे 1-4, कल्पक पत्की 1-14)वि.वि.रायनोज: 6षटकात 5बाद 63धावा(राघव बर्वे 16, अमित परांजपे 14, निरंजन गोडबोले नाबाद 14, कर्णा मेहता 2-4, रोहित भालेराव 2-6);सामनावीर-कर्णा मेहता;
हॉग्स: 6षटकात 2बाद 44धावा(अभिजित तावरे 18(16), सिद्धार्थ बदामीकर 9, अक्षय ओकी 1-3, अंकित दामले 1-10)पराभूत वि.जॅगवॉर्स: 6षटकात 1बाद 45धावा(रवींद्र कासट 25(15,2×6), समीर जोशी नाबाद 14(12), आदित्य गांधी 1-11);सामनावीर-रवींद्र कासट;
टायगर्स: 6षटकात 4बाद 69धावा(अभिषेक ताम्हाणे 23(9,2×4,2×6), अमित कुलकर्णी 19, मधुर इंगहाळीकर 14, गौरव सावगावकर 1-9, नितीन सरदेसाई 1-9)पराभूत वि.स्कायलार्कस: 5.5षटकात 1बाद 70धावा(गौरव सावगावकर नाबाद 26(10,2×4,2×6), अंकुश जाधव 22(15), आशिष राठी नाबाद 14, अभिषेक ताम्हाणे 1-15);सामनावीर-गौरव सावगावकर;
कोब्राज: 6षटकात 2बाद 67धावा(विशाल गोखले 28(15,2×4,2×6), समीर जोग नाबाद 26(11,3×6), प्रतीक वांगीकर 10, अंकित दामले 1-9)पराभूत वि.जॅगवॉर्स: 5.4षटकात 3बाद 68धावा(रवींद्र कासट 26(12,3×4), रिषभ गादिया नाबाद 23(12,1×4,1×6), विशाल गोखले 1-5, असिम देवगावकर 1-11);सामनावीर-रवींद्र कासट;.