भारताची राजधानी दिल्लीत गेले २ महिने शेतकरी अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाला आता हिंसक वळणही मिळाले आहे. त्यामुळे या अंदोलनाबाबत अनेक सेलिब्रेटींनीही आपली मते मांडली आहे. नुकतेच जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने देखील याबाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाबाबत अनेक उलट सुलट प्रतिक्रिया समोर आल्या. त्यातच भारताच्या अनेक स्टार क्रिकेटपटूंनीही शेतकरी अंदोलनाबाबत ट्विट करताना भारताला एकजूट राहण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांच्यावर प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री कंगना रणौतने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनावर ट्विटरची कारवाई
अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते. तिने अनेकदा विविध विषयांवर वाद निर्माण होईल असे ट्विट केले आहे. तिने नुकताच शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत आणखी वाद ओढावून घेतला आहे. त्यामुळे ट्विटरने तिला असे ट्विट न करण्याचीही तंबी दिली होती. अखेर तिने गुरुवारी(4 फेब्रुवारी) भारतीय क्रिकेटपटूंविरुद्ध वादग्रस्त ट्विट केल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आणि तिचे ट्विट ट्विटरने डिलिट केले.
नक्की काय आहे प्रकरण –
बुधवारी (3 फेब्रुवारी) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे अशा अनेक स्टार क्रिकेटपटूंनी शेतकरी अंदोलनाबाबत ट्विट केले होते. त्यानंतर कंगनाने रोहितच्या ट्विटला उत्तर देताना सर्वच क्रिकेटपटूंना ‘धोबी का कुत्ता’ असे संबोधले.
रोहितने ट्विट केले होते की ‘जेव्हा आपण सर्व एकत्र आहोत तेव्हा भारत नेहमीच सशक्त राहिला आहे. यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. आमचे शेतकरी आपल्या राष्ट्राच्या भल्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात आणि मला खात्री आहे की तोडगा काढण्यात प्रत्येकजण आपली भूमिका बजावेल.ट
रोहितच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटले की ‘सर्व क्रिकेटपटूंची अवस्था ही धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखेच सर्वजण वागत आहेत. शेतकऱ्यांसाठीच क्रांती घडवणाऱ्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का, हे कोणी का विचारत नाही. हे सर्व दहशतवादी आहेत. हे बोलायला घाबरताय कशाला?’
कंगनाचे हे ट्विट नंतर डिलिट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील मैदाने आणि यांच जरा वाकडचं! इंग्लंडचे ४ गोलंदाज, जे तरसतात भारतीय खेळाडूंच्या विकेटसाठी
कहर! १२ चेंडूत अर्धशतक झळकावलं अन् २७ चेंडूत सामनाही गुंडाळला, पाहा व्हिडिओ
इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ धुरंधर पहिल्या दोन कसोटीतून बाहेर