इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रोमांच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवार रोजी (२९ एप्रिल) आयपीएलप्रेमींना डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळाला. डबल हेडरमधील संध्याकाळच्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या २५ व्या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने बाजी मारली. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीकर ललित यादवच्या अप्रतिम गोलंदाजीचे दर्शन घडले.
दरम्यान त्याने कोलकाताच्या अनुभवी क्रिकेटपटू सुनिल नारायणची घेतलेली विकेट प्रभावी ठरली. त्याच्या या भन्नाट विकेटनंतर दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचे तोंड पाहण्यासारखे झाले होते.
१०.२ षटकात ७४ धावांवर कोलकाताने ऑयन मॉर्गनच्या रुपात तिसरी विकेट गमावली. त्यानंतर नारायण पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संघ कठीण स्थितीत असताना त्याच्याकडून महत्त्वपुर्ण खेळीची अपेक्षा होती. परंतु अकरावे षटक टाकत असलेल्या दिल्लीचा फिरकीपटू ललितने नारायला त्याच्या पहिल्याच चेंडूवर पव्हेलियनवा धाडले. त्याने डावखुऱ्या नारायणला चपळतेने चेंडू टाकत त्रिफळाचीत केले.
ललितच्या या अविश्वसनीय गोलंदाजीत सर्वांना दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनची (उर्वरित आयपीएल २०२१ मधून माघार घेतली आहे) झलक पाहायला मिळाली. त्याची अद्भुत गोलंदाजी पाहून प्रशिक्षक पाँटिंग अवाक् झाले. ते तोंड उघडे करुन थक्क होऊन पाहू लागले. त्यांच्या या प्रतिक्रियेने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1387783061543133184?s=20
DC coach Ricky Ponting's reaction as Lalit Yadav scalps two wickets in an over!
Absolute Gold!😂😂😂😂#IPL2021 #DelhiCapitals #DCvKKR #DCvsKKR #YehHaiNaiDilli #KKRHaiTayyar #RishabhPant #DC #KKR #ShubmanGill pic.twitter.com/c06Bh9hUkh
— OneCricket (@OneCricketApp) April 29, 2021
Outstanding bowling by LALIT YADAV 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
💪👌💯@LalitYadav03👍🙏👏
Excellent catch by Steve Smith 🙌 @stevesmith49#DCvsKKR— Sushant Mehta (@SushantNMehta) April 29, 2021
https://twitter.com/navsurani/status/1387782126016286721?s=20
WICKETS BACK TO BACK FOR #LALIT!
Looks like it’s #Lalit’s day out here! @RickyPonting can’t stop himself to acknowledge that!
Come on #Delhi we need more!
👏👏👏👏👏👏#DCvKKR #DCvsKKR #KKRvDC #KKRvsDC #IPL #IPL2021 pic.twitter.com/zfsCfskvcn— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) April 29, 2021
Parth Jindal and Ricky Ponting have completely transformed this franchise, DC now one of the big guns in IPL, this should really teach a lesson to the other franchises.
— Jay (@livi_bhau) April 29, 2021
https://twitter.com/azgothedefiler/status/1387781778883047433?s=20
नारायण हा ललिलची या सामन्यातील दुसरी विकेट ठरला. तत्पुर्वी ९.३ षटकात मार्कस स्टॉयनिसच्या हातून त्याने कोलकाताचा विस्फोटक फलंदाज राहुल त्रिपाठीला झेलबाद केले होते. अशाप्रकारे या सामन्यात ३ षटके गोलंदाजी करताना १३ धावा देत त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या य कामगिरीमुळे दिल्ली संघाने कोलकाता संघाला २० षटकात ६ विकेट्स घेत १५४ धावांवर रोखले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
गरमागरमी! चालू सामन्यात कार्तिक धवनशी भिडला, मग गब्बरनेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर; व्हिडिओ व्हायरल