fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जोफ्रा आर्चरने सहा वर्षांपूर्वी केलेले ट्विट होतेय व्हायरल, रिया संबधी केले होते भाष्य

August 28, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आपल्या ट्विटबद्दल चर्चेत होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आर्चरची अनेक वर्षांची ट्वीट व्हायरल होत होती. हे ट्वीट वर्षांपूर्वीची आहेत. पण सध्याच्या परिस्थितीवर ते अचूकपणे बसतात. विश्वचषकानंतरही आर्चरचे ट्वीट व्हायरल होतच राहिले. नुकतेच आर्चरच्या जुन्या ट्विटमध्ये रिया हे नाव दिसले, तेव्हा भारतीय चाहते हैराण झाले. हे ट्विट शेअर करताना चाहते आर्चरला देव आणि टाइम मशीन म्हणू लागले आहेत.

भारतात सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. या तपासणीत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली जात आहे. ती सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे. आर्चरने 16 जुलै 2014 रोजी ‘रिया आणि टेस्सल’ असे ट्विट केले होते. टेस्सल म्हणजे सामान्य भाषेत, लटकन.

Rhea and tessale 😐

— Jofra Archer (@JofraArcher) July 16, 2014

सुशांतसिंग राजपूतने फाशी घेऊन जीवन संपविले. चाहत्यांनी हे ट्विट बघून अर्थ, तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने  लिहिले आहे की, सहा वर्षांपूर्वी आर्चरला सर्व काही माहीत होते. काही चाहत्यांनी सांगितले की, आर्चरकडे टाइम मशीन आहे. म्हणून त्याला सर्व काही माहीत आहे, तर काही लोक त्याला देव म्हणत आहेत.

काही चाहत्यांनी अगदी असे म्हटले की, आर्चरचे सर्व ट्वीट वाचली पाहिजेत. कारण कोरोना कधी संपेल हे त्यामध्ये लिहिले गेले असावे. त्याचवेळी काही चाहत्यांनी आर्चरला विचारले की, कोहली बाप कधी होणार आहे? हे देखील त्याला माहीत असावे.

जोफ्रा आर्चर आपल्या धोकादायक बाऊन्सरसाठी ओळखला जातो. या शस्त्राच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सतावले होते. पण गेल्या काही दिवसांत आर्चरच्या बाऊन्सरची धार कमी झाली आहे. आर्चरने पदार्पणानंतर 515 बाउन्सर फेकले आहेत, जे बर्‍यापैकी उंच आहेत. जोफ्रा आर्चरलाही विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. इंग्लंडकडून पदार्पण केल्यापासून आर्चरने सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त फक्त पॅट कमिन्सने गोलंदाजी केली.


Previous Post

६०० विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने या फलंदाजाला केलंय सर्वाधिकवेळा बाद; सचिन तेंडुलकरला सुद्धा…

Next Post

गिब्ज, विराटला वगळत रैनाने निवडले जगातील सर्वात्तम ५ क्षेत्ररक्षक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

गिब्ज, विराटला वगळत रैनाने निवडले जगातील सर्वात्तम ५ क्षेत्ररक्षक

आश्चर्यकारक! खेळपट्टीमध्ये दबला चेंडू, सामन्याला झाला उशीर

आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.