Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतासाठी वनडे मालिका नसेल सोपी, ऑस्ट्रेलियन संघात दोन दिग्गजांचे पुनरागमन

भारतासाठी वनडे मालिका नसेल सोपी, ऑस्ट्रेलियन संघात दोन दिग्गजांचे पुनरागमन

March 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Australia-ODI-Team

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) यजमान संघाने जिंकली. उभय संघांतील कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली. वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात दोन खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेलाडू भारताविरुद्ध कसोटी मालिकदरम्यान मायदेशात परतले होते.

भारताविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील (BGT) पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा पराभव मिळाला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर चौथा सामना अनिर्णित राहिला. भारताने ही मालिका 2-1 अशा अंतराने जिंकला. उभय संघांतील या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या एकूण चार खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणास्तव माघर घेतली आणि मायदेशात परतले. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, सलामीवीर डेविड वॉर्नर, फिरकीपटू एश्टन एगर (Ashton Agar) आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवु यांचा समावेश होता. आता या चौघांपैकीच दोघांचे वनडे मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले.

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची आई आजारी असल्याने तो मायदेशात परतला होता. कमिन्सच्या आईचे नाव मारिया असून मागच्या आठवड्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसेच वॉर्नरच्या हाताला दुखापत झाल्याने तो शेवटच्या दोन कसोटीत खेलू शकला नाही. जोश हेजलवुड देखील दुखापतीमुळे, तर एश्टन एगरला संधी मिळत नसल्याने हे चौघे मायदेशात परतले होते. पण वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात डेविड वॉर्नर आणि एश्टन एगर सामील होणार आहेत. पाहुण्या संघासाठी या दोघांचे पुनरागमन अतिशय महत्वाचे ठरू शकते.

कर्णधार पॅट कमिन्स आईच्या निधनानंतर अजून काही दिवस कुटुंबियांसोबत राहणार असल्याने वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसेल. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव स्मित वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे जोश हेजलवुड देखील अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याचे दिसते.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
स्टीव स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, एलेक्स केरी, नेथन एलिस, कॅमरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इगलिस, मारनस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, सीन एबॉट, एश्टन एगर, मार्कस स्टॉयनिस आणि एडम जम्पा.
(Two legendary players returned to the Australia team for the ODI series against India)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम
भारतातील आगामी विश्वचषक मोईन अलीसाठी शेवटचा? दिग्गज अष्टपैलू निवृत्तीच्या तयारीत   


Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

'माझी अंतराआत्मा सांगित आहे, आयपीएलमध्ये एका षटकात...', युवा खेळाडू फूल कॉन्फिडन्समध्ये

Virat-Kohli

बापरे एवढा पैसा..! 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश

Chandrakant Patil

मावळ तालुक्यात क्रिकेटच्या मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी - व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143