इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 हंगामात प्रेक्षक आता अदानी आणि गोएंका यांचे संघ देखील खेळताना पाहू शकतील. आतापर्यंत आठ संघांमध्ये आयपीएल सामने खेळले जायचे. परंतु पुढील वर्षापासून एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या दोन नवीन संघांमध्ये अदानी आणि गोयंका यांचे देखील संघ असू शकतात, असा दावा पीटीआयने केला आहे.
पीटीआयनुसार, दोन नवीन संघ जोडल्याने लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) खात्यात किमान 5000 कोटी रुपये जमा होऊ शकतात. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या (आयजीसी) नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याची अंतिम बोली प्रक्रिया पार पडली आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “कोणतीही कंपनी 75 कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. यापूर्वी दोन नवीन संघांची मूळ किंमत 1700 कोटी रुपये मानली जात होती. परंतु आता मूळ किंमत 2000 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे झाली तर, बीसीसीआयला किमान 5000 कोटी रुपयांचा नफा होईल. कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत. यात अदानी आणि गोएंका ग्रुपचाही समावेश आहे. त्यांनी आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात रस दाखवला आहे. संघ खरेदी करण्यास ज्यांनी सक्रिय स्वारस्य दाखवले आहे त्यात अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयनका ग्रुप, प्रसिद्ध फार्मा कंपनी टोरेंट आणि एक प्रमुख बँकर यांचाही समावेश आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, 3000 कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांनाच बोली प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी असेल. बीसीसीआयला बोलीतून किमान 5000 कोटी रुपयांची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होतील आणि प्रत्येकासाठी ही एक चांगली गोष्ट असेल.
एवढेच नाही तर, बीसीसीआय कंपन्यांना संघ खरेदी करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. यामुळे बोली प्रक्रिया अधिक मनोरंजक होईल. तीनपेक्षा जास्त कंपन्यांना गट तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु जर तीन कंपन्यांना एकत्र येऊन एखाद्या संघासाठी बोली लावायची असेल तर लावता येईल. अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे हे नवीन संघाचे होम ग्राउंड असतील. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियमही संघांची पहिली पसंत असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार
टीम इंडियावर कसोटी मालिका पराभवाचे सावट! ओव्हल अन् मँचेस्टरवरील आकडे आहेत खूपच दुर्देवी
मोठी बातमी! सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, बीसीसीआय अध्यक्षाचा अहवालही…