इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग आहे. या लीगमध्ये पाकिस्तान संघातील खेळाडूंना वगळता, इतर देशातील खेळाडू सहभाग घेत असतात. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंना देखील समावेश दिला गेला होता. यात शाहिद आफ्रिदी, सोहेल तन्वीर या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. परंतु २००८ मध्येच मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर निर्बंध लावण्यात आले.
परंतु जर आयपीएल मध्ये सध्याच्या पाकिस्तान संघातील काही युवा खेळाडूंना संधी मिळाली असती; तर त्यांनी आयपीएल स्पर्धा नक्की गाजवली असती. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
दोन असे पाकिस्तानी क्रिकेटपटू, ज्यांनी आयपीलमध्ये केली असती दमदार कामगिरी-
१. शाहीन आफ्रिदी :
पाकिस्तानी संघाचा २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने २१ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २४ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने खेळलेल्या एकूण २२ वनडे सामन्यात ४५ गडी बाद केले आहेत. यात त्याने २ वेळा ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.
तसेच त्याची पाकिस्तान सुपर लीगमधील कामगिरीही प्रशंसनीय राहिली आहे. त्यामुळे या खेळाडूला आयपीएलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली असती, फ्रँचायजींनी नक्कीच जास्तीची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट केले असते.
२. बाबर आजम :
पाकिस्तान संघासाठी महत्वाची भुमिका बजावत असलेला फलंदाज बाबर आजम याने २०१५ मध्ये पाकिस्तान संघात पदार्पण केले होते. ५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ४७ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ४८.०५ च्या सरासरीने १७३० धावा केल्या आहेत. तसेच पकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आजम आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अशातच जर बाबर आजम आयपीएल स्पर्धेच्या लिलावात सहभागी झाला असता; तर नक्कीच त्याने आपल्या प्रतिभेची छाप सोडली असती.
महत्त्वाच्या बातम्या-
अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा ‘तो’ व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा
इंग्लंडला पराभवानंतर अजून एक धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
नादच खुळा! विजय हजारे ट्रॉफीत देवदत्त पड्डीकलचं सलग चौथं शतक; ‘रनमशीन’ची केली बरोबरी