मुंबई, २८ ऑगस्ट २०२३: तरुण प्रतिभेचा शोध आणि जोपासना करण्याच्या वचनाचा एक भाग म्हणून यू मुम्बाने २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या १०व्या आवृत्तीसाठी ४ युवा खेळाडूंना करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या शेकडो खेळाडूंपैकी सोमबीर गोस्वामी, मुकिलन षणमुगम, गोकुलकन्नन एम आणि बिट्टू बनवाला यांची यू मुंबाकडून खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
हे चारही खेळाडू त्यांच्या अफाट क्षमतेसह अनेक PKL संघाच्या प्रमुख संघात बसू शकतात आणि यू मुम्बासाठी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतील. सोमबीर गोस्वामी (डावा कोपरा), मुकिलन षणमुगम (डावा कोपरा), गोकुलकन्नन एम (उजवा कोपरा) आणि बिट्टू बनवाला (उजवा कोपरा) हे संघाच्या सध्याच्या बचावफळीच्या ताकदीत अधिक भर घालतील.
न्यू यंग प्लेयर्स ( NYP) निवडी प्रशिक्षक घोलामरेझा मजंदरानी, केसी सुथार आणि जीवा कुमार यांच्या उपस्थितीत झाल्या. प्रशिक्षकांव्यतिरिक्त, यू मुंबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल चंधोक हे देखील NYP निवडींमध्ये सामील होते. त्यांनी NYP निवड शिबिरातील प्रत्येक उमेदवाराच्या कामगिरीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले.
“युवा कबड्डी मालिकेतून देशभरातील उच्च-गुणवत्तेचे, PKL साठी तयार खेळाडूंचा सतत पुरवठा होत आहे, एवढा मोठा युवा प्रतिभासंचय पाहणे हे आश्चर्यकारक आहे. पण, शेकडो खेळाडूंपैकी फक्त चार खेळाडूंची निवड करू शकलो, ही आमच्यासाठी खेदाची गोष्ट आहे. मला आनंद आहे की आम्हाला आमच्या गरजेनुसार असे खेळाडू मिळू शकले जे प्रो कबड्डी संघाच्या सुरुवातीच्या ७ मध्ये बसण्यासाठी पुरेसे चांगले असू शकतात. आमचे प्रशिक्षक एक अभेद्य बचाव तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि म्हणूनच मला आनंद आहे की आम्ही ४ अत्यंत प्रतिभावान तरुण बचावपटू मिळवण्यात यशस्वी झालो,” असे चांदोक यांनी म्हटले. यू मुंबाने आगामी प्रो कबड्डी लीगसाठी सुरिंदर सिंग, जय भगवान, रिंकू शर्मा, हैदर अली एक्रामी आणि शिवम ठाकूर यांना संघात कायम ठेवले आहे. (U Mumba inducted 4 defenders into the squad under PKL’s New Young Players initiative)
चार NYP बद्दल थोडक्यात:
सोमबीर गोस्वामी (हरयाणा)
स्थान: डावा कोपरा
३० व्या सब ज्युनियर पटना, बिहार २०१९ स्पर्धेत रौप्य पदक; गुवाहाटी आसाम २०२०च्या तिसऱ्या खेलो इंडिया युवा खेळांमध्ये सुवर्णपदक; पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२३ मध्ये सुवर्णपदक.
बिट्टू बनवाला (हरयाणा)
स्थान: उजवा कोपरा
युवा कबड्डी लीगच्या मान्सून आवृत्तीचा एक भाग आहे. त्या हंगामात त्याने ११७ गुण मिळवले आणि तो दुसरा-सर्वोत्कृष्ट बचावपटू होता.
मुकिलन षणमुगम (तामिळनाडू)
स्थान: डावा कोपरा
युवा कबड्डी मालिकेतील सर्वोत्तम बचावपटूंपैकी एक होता. त्या हंगामात २ हाय फाईव्हसह ५९ टॅकल पॉइंट मिळवले. युवा कबड्डी मालिकेची अंतिम फेरी गाठली.
गोकुलकन्नन एम (तामिळनाडू)
मुकिलनसोबत युवा कबड्डी मालिकेतही खेळला आणि त्याने ७ सुपर टॅकल आणि १० हाय फाईव्हसह ९६ टॅकल पॉइंट मिळवले. युवा कबड्डी मालिकेची अंतिम फेरी गाठली.
महत्वाच्या बातम्या –
गुड न्यूज! रिषभ पंत करू लागला सायकलिंग, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार वॉर्नरची कमेंट चर्चेत
‘भारतातील विश्वचषक भारताने जिंकावा…’, दिग्गज महिला खेलाडूची मोठी प्रतिक्रिया