गुरुवारी (३० डिसेंबर) १९ वर्षाखालील आशिया चषकाच्या (u19 asia cup 2021) दुसऱ्या उपांत्य सामन्यात (u19 asia cup semifinal match) भारतीय संघाने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. उपांत्य सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील संघासमोर (u19 team india) बांगलादेशचे आव्हान होते. भारताने या सामन्यात सोपा विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षाखालील आशिया चषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने तब्बल १०३ धावांच्या मोठ्या फरकाने बांगलादेश संघाचा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सपूर्ण ५० षटके खेळून काढली आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर २४३ धावा केल्या. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शेख राशीदने सर्वाधिक ९० धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद देखील राहिला. शेखने या धावा करण्यासाठी १०८ चेंडूंचा सामना केला, यामध्ये त्याच्या तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही.
तर दुसरीकडे बांगलादेश संघ फलंदाजीला आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांची अवस्था खराब केली. बांगलादेशने ५० धावांमध्ये त्यांच्या पहिल्या चार महत्वाचे विकेट्स गमावल्या. बांगलादेशचा एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. अरिफुल इस्लामने बांगलादेशसाठी सर्वाधिक ४२ धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्याने ७७ चेंडू खेळले आणि यादरम्यान त्याने एक चौकार ठोकला. बांगलादेशचा संपूर्ण संघ ३८.२ षटकात अवघ्या १४० धावा करून सर्वबाद झाला.
#ACC #U19AsiaCup #Final, here we come! 👏 👏
India U19 beat Bangladesh U19 by 103 runs in the semifinal and seal a place in the summit clash. 👌 👌#INDVBAN#BoysInBlue
📸 📸: ACC pic.twitter.com/CPvKNKkyfs
— BCCI (@BCCI) December 30, 2021
गोलंदाजीमध्ये भारताच्या राजवर्धन हंगर्गेकर , रवि कुमार, राज बावा आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळवल्या. तसेच निशांत सिंधू आणि कौशल तांबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसरीकडे बांगलादेशसाठी रकिबुल असनने १० षटकांमध्ये ४१ धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त तन्जिम हसन शाकीब, नाईमुर रोहमन, एसएम मेहरूब आणि आरिफूल इस्लामने बांगलादेशसाठी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.
तत्पूर्वी एशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने २२ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. आता स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (३१ डिसेंबर) खेळला जाईल. अंतिम सामन्यात भारताचा १९ वर्षाखालील संघ आणि श्रीलंकेचा १९ वर्षाखालील संघ आमने-सामने असतील.
महत्वाच्या बातम्या –
विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार
टोकियो ऑलिम्पिक! भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
व्हिडिओ पाहा –