भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. मात्र, आत्तापासून विश्वचषकाच्या भारतातील आयोजनावर काळे ढग दाटून आले आहेत. कारण, भारतातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता, आयसीसी ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याचा विचार करू लागली आहे. एका वृत्तानुसार, आयसीसी सध्या भारतातील कोविडच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. म्हणूनच, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीला (युएई) विश्वचषकासाठीचे राखीव ठिकाण म्हणून ठेवले आहे. जेणेकरुन भारतातील परिस्थिती सुधारली नाही तर, हा विश्वचषक युएईमध्ये होऊ शकेल.
भारतातील एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या बातमीनुसार, श्रीलंकेलाही भारताचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. आयसीसी बीसीसीआयच्या नियमित संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सोमवारी (२७ एप्रिल) एकाच दिवसात भारतातील कोरोना रुग्णांची साडे तीन लाखांनी वाढली. यावरून भारतातील या आजाराची भीषणता समजली जाऊ शकते.
विश्वचषकासाठी पाठवली होती मैदानांची नावे
सध्या आयसीसीचे शिष्टमंडळ भारतात आहे. बीसीसीआयने गेल्या आठवड्यात टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नऊ मैदानांचे प्रस्ताव ठेवले होते. टी२० विश्वचषक ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि संभाव्यता १३ नोव्हेंबरला संपेल. बीसीसीआयने गेल्या वर्षी युएईमध्ये आयपीएलचे आयोजनही केले होते. त्यावेळी भारतातील कोविडची प्रकरणे सध्याच्या लाटेपेक्षा कमी होती आणि कमी वेगाने पसरत होती.
ऑस्ट्रेलियाने बंद केली विमानसेवा
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा समावेश कोविड असणाऱ्या देशांच्या ‘रेड लिस्ट’ मध्ये केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्याचवेळी, ऍण्ड्रू टाय, केन रिचर्डसन व ऍडम झम्पाने कोरोनाच्या भीतीने उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याचवेळी इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील मायदेशी परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
केवळ ३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला विराट कधी देणार संधी? चाहत्यांना पडला प्रश्न
आरसीबीविरूद्ध दिल्लीला भासणार या खेळाडूची कमतरता