वनडे विश्वचषकाचा उपांत्य सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ यंदाच्या वनडे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहेत. रविवारी (19 नोव्हेंबर) अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्यासाठी 1,30,000 पेक्षा अधिक प्रेक्षक जमतील. पण चक्क मुख्यमंत्र्यांचा मुलगा, तसेच आपल्या राज्याचा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री असणाऱ्याला या सामन्यासाठी तिकिट मिळाले नाहीये.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले. भारताने सलग 10 विजय मिळवून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. तर पहिल्या दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मागच्या सलग आठ सामन्यांमध्ये जिंकला आहे. अंतिम सामन्यात या दोन्ही बलाढ्य संघांमधील लढत रोमांचक होण्याची पूर्ण शक्यता आहे. क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज, तसे बॉलिवूड स्टार्स या सामन्यासाठी हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत अनेक राजकीय चेहरे अहमदाबादेत सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकता. असे असले तरी, द्रविड मुनेत्र कळघम (DMK) म्हणजे डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना या सामन्याला मुकण्याची वेळ येऊ शकते.
अंतिम सामन्यासाठी अवघे काही मिनिट ऑनलाईन तिकिट विक्री सुरू राहिली. चाहते आधीपासूनच तिकिटांची वाट पाहत असल्यामुळे झटपट सर्व तिकिट विकले गेले. तसेच गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून दिल्या जाणाऱ्या तिकिटांसाठीही झुंबड उडाल्याचे दिसते. याच कारणास्तव तमिळनाडूचे युवक कल्यान आणि क्रीडामंत्री अदयनिधी स्टॅलिन यांना देखील तिकिट मिळाले नाहीये. स्वतः उदयनिधींकडून याबाबत माहिती मिळाली. “सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. मला देखील तिकिट मिळाले नाहीये. जर तिकिट मिळाले, तर नक्कीच मी हा सामना पाहण्यासाठी जाईल. सर्वांप्रमाणे मलाही या सामन्याची उत्सुकता लागली आहे.”
दरम्यान, उदयनिधी मागच्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. आपल्या विधानांमुळे त्यांनी सर्वाचेच लक्ष्य स्वतःकडे ओढून घेतले होते. अशातच विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबबत त्यांची प्रतिक्रिया पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. अशात त्यांना या सामन्याचे तिकिट मिळणार की, त्यांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही, हे पाहण्यासारखे असेल. अदयनिधीचे हे द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आहेत. (Udayanidhi Stalin did not get the ticket for India vs Australia World Cup final)
महत्वाच्या बातम्या –
शाकिबला डच्चू देत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशने निवडला नवा कर्णधार
CWC2023 । ‘सगळ्यांना माहीत आहे रे…’, ओळख करुन देताच रोहितचा जोक