ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रथमच उल्हासनगर महापौर कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. उल्हासनगरमध्ये प्रथमच ठाणे जिल्हास्तरीय पुरुष ‘अ’ गट व महिला गटाच्या भव्य मँटवरील “महापौर चषक” कबड्डी स्पर्धा होत आहे.
दिनांक २१ जानेवारी २०२० ते २३ जानेवारी २०२० पर्यंत हिंदुह्रूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रिडासंकुल (व्ही.टी.सी. ग्राऊंड), प्रभाग समिती क्र.०३ कार्यालय, आशेळे गांव रोड, उल्हासनगर-४ येथे आयोजित केल्या आहेत.
सदर स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेले पुरुष ‘अ’ गटाचे १६ व महिला गटाचे १२ नावाजलेले संघ सहभागी होणार आहेत. व सदर स्पर्धा ही बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. आयोजकानी या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या नियोजनाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात केली आहे.
कुंडल येथे भव्य राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा
वाचा????https://t.co/sJrAh24zS5????#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020
क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
वाचा????https://t.co/E8YXIR4IeL????#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020