पुणे, १९ जुलै २०२३ : भारताचा आघाडीचा पुरुष टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि रिथ रिश्या टी यांनी अविश्वसनीय कामगिरी करताना गोवा चॅलेंजर्सला ९-६ अशा फरकाने यू मुंबा टीटीवर विजय मिळवून दिला. फॉर्मात असलेल्या यू मुंबा टीटी संघाला अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. गोवा चॅलेंजर्स संघाने पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये यू मुंबा टीटीवर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
महिला एकेरीच्या अखेरच्या सामन्यात यू मुंबाला ३-० असा विजय मिळवणे गरजेचा होता. यू मुंबा टीटीकडून लिली झँग आणि गोवा चॅलेंजर्सकडून रिथ तेनिसन खेळल्या. यू मुंबाच्या लिलीने पहिल्या गेममध्ये दमदार खेळ करताना सर्व्हिसच्या जोरावर ८८ टक्के गुण कमावत ११-६ अशी बाजी मारली. या गेममुळे यू मुंबा टीटीने पिछाडी ६-७ अशी कमी केली. तिसऱ्या गेममध्ये लिली झँगने पिछाडीवरून चांगले पुनरागमन केले होते, परंतु रिथने झटपट गुण घेत ९-५ अशी आघाडी मिळवली. रिथने ११-६ असा हा गेम घेताना गोवा चॅलेंजर्सचा विजयही पक्का केला. तिसरा गेम ११-९ असा जिंकून रिथने सीझन ४ मधील आतापर्यंत अपराजित राहिलेल्या यू मुंबाचा ६-९ असा पराभव केला.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगला प्रोत्साहन दिले आहे. त्याआधी, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांच्यातली पुरूष एकेरीची लढत निर्णायक ठरणारी होती. मानव ठक्करने पहिला गेम ११-१० असा घेत यू मुंबा टीटीला ही बरोबरी मिळवून दिली होती. दुसऱ्या गेममध्ये गोवा चॅलेंजर्सच्या हरमीतने चांगला खेळ केला. मानवकडून त्याला प्रत्युत्तर मिळताना दिसले, परंतु हरमीतने ११-७ असा हा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मानव व हरमीत यांच्यात रॅलीचा सुरेख खेळ पाहायला मिळाला, दोन्ही खेळाडू एकमेकांना मागे ढकलून खेळण्यास भाग पाडताना दिसले. हरमीतने ११-८ अशी बाजी मारली.
तत्पूर्वी, DafaNews द्वारा समर्थित सीझन ४ मधील सर्वोत्तम रँकींग असलेला खेळाडू क्वाद्री अरुणाने पुरुष एकेरीत २-१ अशा फरकाने गोवा चॅलेंजर्सच्या अलव्हारो रॉब्लेसचा पराभव केला. क्वाद्रीने पहिला गेम ११-६ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या खेळाडूने क्वाद्रीला सडेतोड उत्तर दिले. त्याने फोरहँडचे सुरेख फटके मारले. पण, या गेमचा निकाल क्वाद्रीच्याच बाजूने ११-१० असा लागला. तिसरा गेम देखील अलव्हारोच्या बाजूने ११-८ असा गेला. DafaNews द्वारा समर्थित सीझन ४ मधील सर्वोत्तम रँकींग क्वाद्रीला स्पॅनिश पॅडलरच्या दृढतेशी जुळणे कठीण वाटले.
महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात सुथासिनी सवेत्तबटने २-१अशा फरकाने दिया चितळेचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. सुथासिनीने पहिला गेम ११-७ असा सहज जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या दियाने आक्रमक खेळ करताना जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावर असलेल्या सुथासिनीला चांगली टक्कर दिली. दुसऱ्या गेममध्ये दियाने प्रतिकार केला, परंतु तिला विजय मिळवता आला नाही. सुथासिनीने हाही गेम ११-९ असा जिंकला. या दोन्ही खेळाडूंमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. जागतिक क्रमवारीत १०७व्या क्रमांकावर असेल्या दियाने तिसऱ्या गेममध्ये ११-९ असा विजय मिळवला.
मिश्र दुहेरीत हरमीत देसाई/सुथासिनी यू मुंबाच्या मानव ठक्कर/लिली झँग जोडीवर २-१ असा विजय मिळवला आणि गोवा चॅलेंजर्सला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. हरमीत/सुथासिनी यांनी सामन्यावर चांगली पकड घेतली होती. मानव/लिली यांच्यासोबत त्यांचा रॅलीचा जबरदस्त खेळ पाहून चाहते सुखावले होते. गोवा चॅलेंजर्सच्या हरमीत/सुथासिनी जोडीने पहिले दोन गेम ११-८, ११-८ असे जिंकून आघाडी मिळवली. मानव/लिलीने तिसरा गेम ११-७ असा जिंकला.
निकाल
गोवा चॅलेंजर्स ९-६ यू मुंबा टीटी
अलव्हारो रॉब्लेस १-२ क्वाद्री अरुणा ( ६-११, १०-११, ११-८)
सुथासिनी सवेत्तबट २-१ दिया चितळे ( ११-७, ११-९, ९-११)
हरमीत/सुथासिनी २-१ मानव/लिली ( ११-८, ११-८, ७-११)
हरमीत देसाई २-१ मानव ठक्कर ( १०-११, ११-७, ११-८)
रिथ तेनिसन २-१ लिली झँग ( ६-११, ११-६, ११-९)
महत्वाच्या बातम्या –
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स
BREAKING! 16व्या आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला भारत-पाकिस्तान भिडणार