fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाकिस्तानच्या ‘दिग्गज’ क्रिकेटपटूच्या भविष्याचा फैसला ११ जूनला, निकाल विरोधात गेला तर…

मुंबई ।पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर शिस्तपालन समितीने तीन वर्षांची बंदी घातली होती. या निर्णयाविरुद्ध अकमलने अपील करण्यात केले होते. उच्च न्यायालयचे माजी  न्यायाधीश (सेवानिवृत्त) फकीर मोहम्मद खोखर हे 11 जून रोजी यावर निर्णय देतील, अशी  माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. 

पीसीबीने आपल्या वेबसाइटवर उमर अकमलला देण्यात आलेली सुनावणीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. उमर अकमलने संशयित सट्टेबाजांसोबत झालेल्या बैठकांमधील माहिती सांगण्यास नकार दिला आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाविषयी त्याने अद्यापही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली.

लाहोर येथील डिफेन्स हाऊसिंग सोसायटीमध्ये अकमलने दोन अज्ञात व्यक्तींसोबत चर्चा केली होती. त्यावेळी अकमलने आपण चूक केल्याचे कबुल केले होते, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळातील सूत्रांनी दिली. उमर अकमलवर जर बंदी कायम ठेवली तर त्याची क्रिकेट कारकीर्द धोक्यात येऊ शकते.

You might also like