मेलबर्न। शनिवारपासून(२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला जोरदार धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याचे स्कॅन करण्यासाठी त्याला आता घेऊन जाण्यात येत आहे, याविषयी बीसीसीआयने माहिती दिली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ८ व्या आणि वैयक्तिक चौथ्या षटकात गोलंदाजी करत असताना त्याच्या पोटरीला दुखापत झाली. त्यामुळे त्याने हे षटकही पूर्ण केले नाही. त्याचे षटक मोहम्मद सिराजने पूर्ण केले.
त्याला ही दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर लगेचच बीसीसीआयच्या मेडिकल टीमने प्रथोमोपचार केले असून आता त्याच्या पोटरीचे स्कॅन करण्यात येणार आहे.
Umesh Yadav complained of pain in his calf while bowling his 4th over and was assessed by the BCCI medical team. He is being taken for scans now. #AUSvIND pic.twitter.com/SpBWAOEu1x
— BCCI (@BCCI) December 28, 2020
विशेष म्हणजे भारतासाठी हा मोठा धक्का असेल. कारण सध्या भारताचे इशांत शर्मा, भूवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे तिन्ही प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने या कसोटी मालिकेचा भाग नाहीत.