कसोटीत 10,000 धावा करणारे पहिलेच क्रिकेटपटू ठरलेल्या सुनिल गावसरकरांच्या बाबतीत एकदा एक विचित्र किस्सा घडला होता. त्यांचे केस एकदा चक्क चालू सामन्यात मैदानावरील पंचांनीच कापले होते.
झाले असे की 1974 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात गावसकर फलंदाजी करत होते. त्यावेळी त्यांचे केस सारखे डोळ्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तेव्हा त्यांनी मैदानावरील पंच डिकी बर्ड यांना त्यांचे केस केपण्याची विनंती केली. यासाठी बर्ड यांनी तयारी दाखवली. त्यांनी त्यांच्याकडे चेंडूच्या शिवणीचे धागे कापण्यासाठी असणाऱ्या कात्रीने गावसरकरांचे केस कापले होते.
गावसकर भारताकडून १२५ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ५१.१२च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. तसेच ३४ कसोटी शतकं करणारे गावसकर एकेकाळी कसोटीत सर्वाधिक धावा व शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी होते.
खास लेख-
भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा
आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू