आयपीएल २०२२ मध्ये उमरान मलिक याने आपल्या धारदार गोलंदाजी आणि वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे. परंतु सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये आपल्या वेगामुळे त्याने सपाटून मार खाल्ला होता. मात्र आता त्याने दमदार पुनरागमन करत संघाला विकेट्सही मिळवून दिल्या आहेत. शुक्रवारी (१५ एप्रिल) मुंबई येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना मलिकने शानदार गोलंदाजी केली आणि संघाला २ महत्त्वपूर्ण विकेट्सही मिळवून दिल्या. त्याच्या या कामगिरीवर हैदराबाद संंघाचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन प्रभावित झाला असून सामन्यादरम्यान तो एका क्षणी आनंदाने उड्या मारताना दिसला.
त्याचे झाले असे की, हैदराबादकडून (SRH vs KKR) मलिक १०वे षटक टाकण्यासाठी आला होता. आपल्या या षटकात वेगवान चेंडू टाकत तो कोलकाताच्या फलंदाजांना दबावात टाकत होता. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer Wicket) जागा बनवून फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मलिकने (Umran Malik) वेगवान यॉर्कर टाकला होता. या चेंडूवर श्रेयसला अचूक फटका मारता आला नाही आणि तो थेट त्रिफळाचीत झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
श्रेयसची विकेट गेल्यानंतर हैदराबादच्या डगआऊटमध्ये बसलेला डेल स्टेन (Dale Steyn) आणि मुख्य प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन अत्यंत खुश झाले. स्टेन आनंदाने उठला आणि मुरलीधरनजवळ जाऊन त्याच्या पाठीला कौतुकाने थोपटू (Dale Steyn Celebration) लागला. यावेळी हैदराबाद संघाचे इतर खेळाडूही या विकेटचा आनंद साजरा करताना दिसले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Two pacers, same joy ☺️
Follow the match ▶️ https://t.co/HbO7Uh4Tcq#TATAIPL | #SRHvKKR | @SunRisers | @DaleSteyn62 pic.twitter.com/eGFGpj2QIL
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
या सामन्यात मलिकने प्रशंसनीय गोलंदाजी केली. ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत त्याने २ विकेट्स घेतल्या. यामध्ये श्रेयसव्यतिरिक्त शेल्डन जॅक्सनच्या विकेटचाही समावेश होता. त्याच्या या हंगामातील कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत ५ सामने खेळताना १८ षटके फेकली आहेत व ९.६१ च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी २७ धावांवर २ विकेट्स इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी
IPL 2022| केकेआर पराभूत होऊनही आंद्रे रसलच्या नावावर अनोखा विक्रम, युसूफ पठाणला टाकलंय मागे
MI vs LSG| रोहितचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; मुंबईकडून ‘या’ खेळाडूचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन